अ‍ॅपशहर

वाहतूक पोलिसांशी वाद घालणं भोवणार

ट्रॅफिकचे नियम सर्रास तोडून वर वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालणे आता महागात पडणार आहे. कारण, वाहतूक पोलिसांसोबत वाहनचालकांनी घातलेली हुज्जत किंवा वादविवाद थेट कॅमेऱ्यात रेकॉर्ड होणार असून तो कायदेशीर कारवाईसाठी पुरावा म्हणून वापरला जाणार आहे.

Maharashtra Times 19 Jul 2017, 12:27 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम traffic police to be equipped with wifi enabled body cams
वाहतूक पोलिसांशी वाद घालणं भोवणार


ट्रॅफिकचे नियम सर्रास तोडून वर वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालणे आता महागात पडणार आहे. कारण, वाहतूक पोलिसांसोबत वाहनचालकांनी घातलेली हुज्जत किंवा वादविवाद थेट कॅमेऱ्यात रेकॉर्ड होणार असून तो कायदेशीर कारवाईसाठी पुरावा म्हणून वापरला जाणार आहे.

ट्रॅफिकचे नियम पाळण्यावरून वाहनचालक व पोलिसांमध्ये अनेकदा वाद होतात. या वादातून पोलिसांवर हल्ले होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. मात्र, ठोस पुराव्याअभावी हल्लेखोरांवर कारवाई होत नाही. याची गंभीर दखल घेऊन वाहतूक पोलिसांना वायफाय कॅमेरा दिला जाणार आहे. वॉकी-टॉकी व इतर गोष्टींबरोबरच पोलिसांना आता हा कॅमेराही सोबत बाळगावा लागणार आहे. या कॅमेऱ्यात वाहतूक पोलिसाचं प्रत्येक वाहनचालकांसोबतचं संभाषण रेकॉर्ड होणार आहे.

वाहतूक पोलिसांना देण्यात येणाऱ्या १०० कॅमेऱ्यांची चाचणी सध्या घेतली जात आहे. या कॅमेऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओ क्लिप एडिट करता येणार नाहीत. त्यामुळं त्यात काही फेरफार करणं अशक्य होणार आहे, असं वाहतूक विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं. यामुळं वाहतूक पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांना नक्कीच आळा बसेल, असा विश्वासही पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज