अ‍ॅपशहर

नाट्यसंमेलनात जिवंत कलावंतांना श्रद्धांजली

जिवंत कलावंताला श्रद्धांजली वाहण्याचा अनोखा पराक्रम मध्यवर्ती नाट्य परिषदेने नाट्य संमेलनामध्ये बुधवारी केला.

Maharashtra Times 14 Jun 2018, 2:15 am
म. टा. प्रतिनिधी, प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल, मुलुंड
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tribute to living artists in the natya sammelan
नाट्यसंमेलनात जिवंत कलावंतांना श्रद्धांजली


जिवंत कलावंताला श्रद्धांजली वाहण्याचा अनोखा पराक्रम मध्यवर्ती नाट्य परिषदेने नाट्य संमेलनामध्ये बुधवारी केला. ज्येष्ठ गायक आणि अभिनेते प्रसाद सावकार यांचे छायाचित्र दिवंगतांमध्ये टाकून त्यांना हयातीतच श्रद्धांजली वाहण्यात आली. ही बाब लक्षात आल्यानंतर छायाचित्र काढण्यात आले.

काळाच्या पडद्याआड गेलेल्या दिवंगत कलावंताच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी त्यांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. या यादीमध्ये प्रसाद सावकार यांचे छायाचित्र लावण्यात आले होते. ते पाहून अनेकांना धक्का बसला. सावकार यांच्या पत्नीचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. मात्र मध्यवर्ती नाट्य परिषदेने त्याची शहानिशा न करता प्रसाद सावकार यांचेच निधन झाले आहे, अशा गैरसमजुतीतून त्यांचेच छायाचित्र दिवंगतांच्या यादीत लावले. संमेलनाच्या मुख्य रंगमंचाला सुधा करमरकर यांचे नाव देण्यात आले आहे. दिवंगतांच्या छायाचित्रांमध्ये करमरकर यांचे छायाचित्र नसल्याचे दिसून आले.

गेल्यावर्षी सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी दिवंगत माजी संमेलनाध्यक्ष रा. ग. जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र पाठवले होते. यावरून त्यांची खिल्ली उडवण्यात आली होती. मुलुंडच्या नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष तावडे आहेत हादेखील एक योगायोग आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज