अ‍ॅपशहर

ट्विंकलने आदित्यनाथांना दिला विचित्र सल्ला

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची तुलना गुंडाशी केल्यानं बॉलिवूड निर्माता शिरीष कुंदर अडचणीत आला असतानाच, अभिनेत्री आणि निर्माती ट्विंकल खन्नानंही योगींना अत्यंत विचित्र सल्ला देऊन नवा वाद निर्माण केला आहे.

Maharashtra Times 26 Mar 2017, 10:22 am
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम twinkle khanna advices yogi adityanath to do aasna
ट्विंकलने आदित्यनाथांना दिला विचित्र सल्ला


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची तुलना गुंडाशी केल्यानं बॉलिवूड निर्माता शिरीष कुंदर अडचणीत आला असतानाच, अभिनेत्री आणि निर्माती ट्विंकल खन्नानंही योगींना अत्यंत विचित्र सल्ला देऊन नवा वाद निर्माण केला आहे.

योगी आदित्यनाथ यांनी पोटातील गॅस निघेल असं आसन करावं, अशी टिप्पणी ट्विंकलनं एका कार्यक्रमात केली. इतकंच नव्हे तर, 'भंपक भगवा' या नव्या रंगाची घोषणा करण्याची सूचना आपण एशियन पेन्ट्सला केली असल्याचं सांगत तिनं आदित्यनाथ यांच्या भगव्या वस्त्रांवरही ताशेरे ओढले.

महिलांचे अधिकार, स्त्री स्वातंत्र्य या विषयावरील एका चर्चासत्राला ट्विंकल खन्नानं हजेरी लावली. त्यावेळी योगी आदित्यनाथ यांनी महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांकडे तिचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावर प्रतिक्रिया देताना, बिनधास्त आणि बेधडक ट्विंकलनं खोचक टिप्पणी केली. मुख्यमंत्र्यांनी असं आसन करावं ज्यामुळे पोटातील गॅस बाहेर निघण्यास मदत होईल, असं तिनं सुनावलं. तिचं हे विधान सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे.

Asian paints must announce the new color of the season- 'Beguiling Saffron' with a tagline: Orange is the new Brown #UPset — Twinkle Khanna (@mrsfunnybones) March 19, 2017
दरम्यान, फराह खानचा पती शिरीष कुंदर याने दोनच दिवसांपूर्वी योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल वादग्रस्त ट्विट केलं होतं. एका गुंडाकडून दंगली रोखण्याची अपेक्षा करणं म्हणजे एका बलात्काऱ्याकडून बलात्कार थांबवण्याची अपेक्षा करण्यासारखंच आहे, अशी मुक्ताफळं त्यानं उधळली होती. त्यावरून बराच गहजब झाला होता. त्यानंतर हे ट्विट काढून टाकत कुंदरने माफीही मागितली होती. तरीही, त्याच्याविरोधात उत्तर प्रदेश पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. आता ट्विंकलच्या विधानावर योगींचे समर्थक काय उत्तर देतात, याबद्दल उत्सुकता आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज