मुंबईः
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त ट्विटरनं त्यांना अनोखी आदरांजली वाहिली आहे. 'महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त ट्विटरनं गांधीजींचा एक खास इमोजी तयार केला असून, २ ऑक्टोबरपासून आठवडाभर हा इमोजी ट्विटरवर असणार आहे. पूर्ण एक आठवडा ट्विपल्सना हा इमोजी वापरता येणार आहे.
#गांधीजयंती, #महात्मागांधी, #एमकेगांधी या इंग्रजी हॅशटॅगचा आणि #गांधीजयंती या मराठी हॅशटॅगचा वापर करताच गांधीजींचा हा इमोजी दिसणार आहे. या आधीही ट्विटरनं दिवाळी, गणेश चतुर्थी, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिनाचं निमित्त साधून अशाच प्रकारचे इमोजी आणि हॅशटॅग तयार केले होते.