अ‍ॅपशहर

​ बनावट लायसन्स बनवणारी टोळी जेरबंद

खऱ्या ड्रायव्हिंग लायसन्सप्रमाणे दिसणारे बनावट ड्रायव्हिंग लायसन्स बनवणाऱ्या दोघा आरोपींना गुन्हे शाखा ६ च्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २० हून अधिक बनावट ड्रायव्हिंग लायसन्स हस्तगत करण्यात आली.

Maharashtra Times 14 Apr 2017, 4:01 am
मुंबई ः खऱ्या ड्रायव्हिंग लायसन्सप्रमाणे दिसणारे बनावट ड्रायव्हिंग लायसन्स बनवणाऱ्या दोघा आरोपींना गुन्हे शाखा ६ च्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २० हून अधिक बनावट ड्रायव्हिंग लायसन्स हस्तगत करण्यात आली. दोन्ही आरोपी नेरूळ येथील राहत्या घरी हे परवाने तयार करत असत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम two arrested for making fake driving liscence
​ बनावट लायसन्स बनवणारी टोळी जेरबंद


आरोपी बाबा गुजर (५२), कमलेश उर्फ मुन्ना सिंग गिरी (४०) हे मागील दोन वर्षांपासून बनावट ड्रायव्हिंग लायसन्स बनवत असत. या दोघांकडे दोन नामांकित न्यूज चॅनेलचे बनावट ओळखपत्रही आढळले. कम्प्युटर, फोटो प्रिंटर, पेन डिझिटायझर, साईनिंग पेनच्या मदतीने हे दोघे बनावट लायसन्स बनवत असत. त्यांच्या घरातून १५ बनावट ड्रायव्हिंग लायसन्स, १३०चीप बसवण्यात आलेली लायसन्स तसेच १२० बनावट कोरी पीयूसी पोलिसांनी हस्तगत केली आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज