अ‍ॅपशहर

मेटेंचा आवाज मराठा समाजाला न्याय मिळवून देईल असं नेहमी वाटायचं, उद्धव ठाकरे भावुक

Uddhav Thackeray : मराठवाड्यातील बडे नेते, शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख आणि विधानपरिषदेचे माजी आमदार विनायक मेटे यांचे आज अपघाती निधन झाले. यान निधानाने महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील नेत्यांनी मेटेंबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही मेटेंना श्रद्धांजली वाहत आपल्या भावना व्यक्त केल्या.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Aug 2022, 12:27 pm
मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे नेते आणि माजी आमदार विनायक मेटे यांचे आज सकाळी अपघाती निधन झाले. मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे वर झालेल्या भीषण अपघातात विनायक मेटे यांचे निधन झाले. या घटनेनंतर महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही आपल्या भावना व्यक्त केला आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही विनायक मेटेंबद्दल भावना व्यक्त केल्या.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम uddhav thackeray vinayak mete
मेटेंचा आवाज मराठा समाजाला न्याय मिळवून देईल असं नेहमी वाटायचं, उद्धव ठाकरे भावुक


मराठा समाजातील बांधवांना भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी सतत झगडणारे शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायकराव मेटे यांचे अकाली अपघाती झालेले निधन मनाला वेदना देणारे आहे; ईश्वर त्यांच्या कुटुंबीयास या दुःखद प्रसंगी मनाला धीर देण्यास बळ देवो, अशा शोकभावना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत.

विनायकरावांना गेली अनेक वर्षे जवळून पाहण्याचा योग आला. त्यांचा संघर्ष त्यांच्या समाजासाठी तर असायचाच पण त्याच सोबत तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याची त्यांची भूमिका असायची. भाजपसोबत असताना त्यांची गोपीनाथरावांसोबत सतत भेट व्हायची. आपला संघर्ष हा मराठा समाजाला एक दिवस न्याय मिळवून देईल याबाबत त्यांना खात्री होती, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवस्मारकासाठी कष्ट घेतले, आरक्षणासाठी लढले, जवळच्या सहकाऱ्याला मुकलो, मेटेंच्या निधनाने शरद पवार हळहळले

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असताना मुख्यमंत्री म्हणून नेहमी त्यांच्याशी संवाद होत असे. त्यांची तळमळ आणि शोषितांना न्याय देण्याचा आग्रह, धडपड पाहताना नेहमी त्यांचे कौतुक वाटायचे. अधिवेशन काळात विधिमंडळाच्या आवारात होणाऱ्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकांमध्ये त्यांचा आग्रह कायम विधानपरिषदेत मराठा आरक्षणाबाबत विशेष चर्चा घेण्याचा असे, त्यांच्या अशा अकाली निधनाने कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

रात्रभर प्रवास...चालकाची डुलकी अन् मेटेंच्या गाडीला अपघात; अजित पवारांनी

महत्वाचे लेख