अ‍ॅपशहर

'युती'च्या भवितव्याचा आज फैसला

गेल्या आठवडाभरापासून चर्चेच्या जोर बैठका होऊनही शिवसेना-भाजप युतीचा जांगडगुंत्ता काही सुटलेला नाही. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे चार दिवस उरले असल्यानं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज युती बाबतचा फैसला जाहीर करण्याची शक्यता आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या शिवसेनेच्या मेळाव्यात आज ते निर्णायक भूमिका जाहीर करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Maharashtra Times 23 Jan 2017, 6:47 am
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम uddhav thackeray will take decision on alliance today
'युती'च्या भवितव्याचा आज फैसला

गेल्या आठवडाभरापासून चर्चेच्या जोर बैठका होऊनही शिवसेना-भाजप युतीचा जांगडगुंत्ता काही सुटलेला नाही. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे चार दिवस उरले असल्यानं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज युती बाबतचा फैसला जाहीर करण्याची शक्यता आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या शिवसेनेच्या मेळाव्यात आज ते निर्णायक भूमिका जाहीर करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज सायंकाळी ६ वाजता माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात शिवसेनेच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत. युतीच्या चर्चेच्या गुऱ्हाळामुळे उमेदवारांची यादी तयार असूनही ही यादी शिवसेनेला जाहीर करता आलेली नाही. शिवाय उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघ्या चार दिवसांची डेडलाइन बाकी असताना युतीच्या बैठकीत जागा वाटपावरच चर्चा झालेली नाही. शिवसेनेनं भाजपला केवळ ६० जागा देऊ केल्यानं भाजपमध्ये संतापाचे वातावरण आहे. काल रविवारी भाजप नेत्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. त्यात भाजपच्या २२७ उमेदवारांच्या यादीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत शिवसेनेसोबत युती करण्यावर फारशी चर्चा झाली नसल्याचं सूत्रांनी सांगितलं. काल दिवसभरात दोनवेळा मुख्यमंत्र्यांकडे भाजप नेत्यांच्या बैठका होऊनही शिवसेनेला भाजपकडून कोणताच निरोप न गेल्यानं युती होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र युती होणार नसल्याचं जाहीर करून खलनायक व्हायचं नसल्यानं दोन्ही पक्षातील नेते थेट बोलायला तयार नाहीत. आजच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे युती होणार नसल्याचं थेट तरी सांगतील किंवा शिवसैनिकांना 'कामाला लागा' असं सांगून युती होणार नसल्याचे स्पष्ट संकेत देण्याचे चिन्हं आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज