अ‍ॅपशहर

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या: उद्धव ठाकरे

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा, अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. मोदींनी स्वत: या प्रकरणी लक्ष घालून तातडीने आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना द्यावेत, अशी विनंती ठाकरे यांनी पत्राद्वारे केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Dec 2019, 4:32 pm
मुंबई:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम uddhav

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा, अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. मोदींनी स्वत: या प्रकरणी लक्ष घालून तातडीने आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना द्यावेत, अशी विनंती ठाकरे यांनी पत्राद्वारे केली आहे.

पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात ठाकरे म्हणतात, 'मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे केंद्र सरकारकडे १६ नोव्हेंबर २०१३ रोजी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी आवश्यक निकष मराठी भाषा अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्याबाबत अनेकदा पाठपुरावा करूनही हे प्रकरण केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडे प्रलंबित आहे.'

बाळासाहेबांच्या दक्षिण मुंबईतील पुतळ्यास विरोध

सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने हा विषय साहित्य अकादमीच्या भाषा समितीकडे विचारार्थ असल्याचे कळवले आहे. खूप कालावधीपासून हे प्रकरण प्रलंबित असल्याने पंतप्रधानांनी स्वत: लक्ष घालून मराठीला तातडीने अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, अशी विनंती ठाकरे यांनी केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज