अ‍ॅपशहर

उरणमधील घुसखोरांची रेखाचित्रं जारी

रायगड जिल्ह्यातील उरणजवळच्या नौदल तळाजवळ संशयास्पदरित्या वावरणाऱ्या संशयित घुसखोरांची रेखाचित्रं पोलिसांनी जारी केली असून विविध सुरक्षा यंत्रणांनी युद्धपातळीवर शोधमोहीम हाती घेतली आहे. घुसखोरीच्या वृत्तानंतर मुंबईसह किनारपट्टीच्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून उरणसह आसपासच्या भागांतील सर्व शाळा व महाविद्यालयं आज बंद ठेवण्यात आली आहेत.

Maharashtra Times 23 Sep 2016, 11:36 am
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम uran terror alert police release sketch of suspect search ops on
उरणमधील घुसखोरांची रेखाचित्रं जारी

रायगड जिल्ह्यातील उरणजवळच्या नौदल तळाजवळ संशयास्पदरित्या वावरणाऱ्या संशयित घुसखोरांची रेखाचित्रं पोलिसांनी जारी केली असून विविध सुरक्षा यंत्रणांनी युद्धपातळीवर शोधमोहीम हाती घेतली आहे. घुसखोरीच्या वृत्तानंतर मुंबईसह किनारपट्टीच्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून उरणसह आसपासच्या भागांतील सर्व शाळा व महाविद्यालयं आज बंद ठेवण्यात आली आहेत.

उरण एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतील काही मुलांनी काल सकाळी शस्त्रसज्ज घुसखोरांना पाहिले होते. मुलांनी केलेल्या वर्णनावरून काल रात्री पोलिसांनी संशयित घुसखोरांची रेखाचित्रं जारी केल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे. नौदलाचे प्रवक्ते राहुल सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळकरी मुलांनी पाच ते सहा संशयितांना पाहिले होते. या लोकांनी पठाणी सूट घातले होते. त्यांच्या हातात शस्त्र व पाठीवर बॅगा होत्या.

संशयित घुसखोरांची माहिती मिळताच नौदल, तटरक्षक दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि क्युआरटी यांनी उरण व करंजा भागात कोम्बिंग ऑपरेशन हाती घेतले. हे ऑपरेशन आजही सुरूच असून अद्याप एकही संशयित हाती लागलेला नाही. नौदलाचे हेलिकॉप्टर व हायस्पीड बोटींही समुद्रावर गस्त घालत असून एनएसजी व फोर्स वन कमांडोंचीही मदत घेण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज