अ‍ॅपशहर

अशोक खळे अपघातप्रकरणी एकाला अटक

छत्रपती पुरस्कार विजेते सायकलपटू अशोक खळे (६५) त्यांच्या अपघाताप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी मोईन खान या तरुणाला बुधवारी अटक केली. खळे यांना धडक दिल्याची माहिती लपवून खळे रस्त्यात जखमी अवस्थेत आढळल्याची खोटी माहिती त्याने पोलिसांना दिल्याचे तपासात पुढे आले आहे.

Maharashtra Times 16 Nov 2017, 4:06 am
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम veteran cyclist ashok khale passes away
अशोक खळे अपघातप्रकरणी एकाला अटक

छत्रपती पुरस्कार विजेते सायकलपटू अशोक खळे (६५) त्यांच्या अपघाताप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी मोईन खान या तरुणाला बुधवारी अटक केली. खळे यांना धडक दिल्याची माहिती लपवून खळे रस्त्यात जखमी अवस्थेत आढळल्याची खोटी माहिती त्याने पोलिसांना दिल्याचे तपासात पुढे आले आहे.

दादर परिसरात राहणारे सायकलपटू खळे खोपोलीला जाण्यासाठी सायकलवर साडेपाचच्या सुमारात घरातून निघाले होते. मात्र रात्री ते घरी परतले नाहीत. पोलिस तपासात त्यांचा अपघात झाला असल्याचे समजले. मानखुर्द येथे सकाळी सहा वाजल्याच्या सुमारास वाहनाने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते. दुसऱ्या दिवशी त्यांना केईएम रुग्णालयात आणण्यात आले. त्यानंतर त्यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. पोलिस तपासात खळे यांना एका मोईन खान नावाच्या व्यक्तीने रुग्णालयात दाखल केले होते. चौकशीदरम्यान मोईन काही तरी लपवत असल्याचा संशय पोलिसांना आला होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज