अ‍ॅपशहर

Vinayak Mete: विनायक मेटे अपघात प्रकरणी ब्रेकिंग अपडेट, सुट्टीवर असलेल्या चालक वाघमारेंचा नवा खुलासा

Vinayak Mete Accident News Update: शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर राजकीय खळबळ उडाली असताना आता त्यांच्या मृत्यूवर वेगवेगळ्या शंका विचारल्या जात आहेत. मेटेंच्या पत्नी ज्योती मेटे यांनी केलेल्या आरोपांनंतर आता सुट्टीवर असलेल्या चालक वाघमारे यांनीही नवा खुलासा केला आहे.

Edited byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Aug 2022, 12:22 pm
मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांचा रविवारी पहाटे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातामध्ये मृत्यू झाला होता. त्यांच्या या अपघाताच्या चौकशी प्रकरणात दररोज नवनवी माहिती समोर येत असल्यामुळे त्यांच्या मृत्यूचे गूढ आणखी गडद झाले आहे. सध्या पोलिसांकडून विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या गाडीचा चालक एकनाथ कदम (Eknath Kadam) याची कसून चौकशी केली जात आहे. अशात विनायक मेटे यांच्या दुसऱ्या चालकाने केलेल्या खुलासामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Vinayak Mete accident case


खरंतर, विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनीही या प्रकरणात गंभीर आरोप केले आहे. अशात मेटे यांचे दुसरे चालक समाधान वाघमारे यांनी मोठा खुलासा केला आहे. 'शिक्रापूर रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासा. त्याच्यामधून बरंच काही बाहेर येईल, अशी प्रतिक्रिया समाधान वाघमारे यांनी दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली असून मेटेंच्या घात करण्याचा प्लॅन होता का? अशा चर्चांना उधाण आलं आहे.
हेही वाचा - Vinayak Mete : विनायक मेटेंच्या पत्नीने ७२ तासांच्या तपासात शोधले धागेदोरे, घात की अपघात; संशय वाढला

समाधान वाघमारे म्हणाले की, 'जर त्या दिवशी मी गाडीवर असतो तर मी स्वतःचा जीव दिला असता. मात्र, साहेबांना काहीही होऊ दिलं नसतं. मला वाटतं शिक्रापूरच्या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले तर यामध्ये बरंच काही मिळू शकतं'. त्यांच्या या विधानामुळे आता या प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत गुंतले आहेत? अशा शंका समोर येतात.

समाधान वाघमारे हे विनायक मेटे यांच्याकडे चालक म्हणून काम करत होते. पण, १४ तारखेला त्यांच्या वडिलांचे वर्षश्राद्ध होतं, त्यामुळं ते सुट्टीवर होते. वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ ऑगस्टला ते मेटेंना घेऊन गडबडीत मुंबईच्या दिशेने निघाले होते. यावेळी शिक्रापूरलगत एका इर्टिगा गाडीने दोन वेळा चांगलाच कट मारला. त्यावेळी मी मेटे साहेबांना म्हणालो गाडी थांबवू का? मात्र साहेब म्हणाले ते दारू प्यायले असतील, त्यामुळे तू थांबू नकोस. यावेळी आमची गाडी फक्त ८० च्या स्पीडवर होती. तर गाडीमध्ये मी, मेटे साहेब, बॉडीगार्ड ढोबळे आणि कार्यकर्ता अण्णा मायकर होता,' अशी माहिती त्यांनी दिली.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख