मुंबई
चार वर्षांपासून मैदानावर, पॅव्हेलियनमध्ये, पार्टीमध्ये आणि थेट विमानतळांवरही ज्या जोडीकडे कॅमेऱ्यांचे लक्ष लागून होते, तो भारताचा क्रिकेट कर्णधार विराट कोहली व आघाडीची चित्रपट अभिनेत्री अनुष्का शर्मा सोमवारी इटलीतील टस्कनी शहरात विवाहबंधनात अडकले.
श्रीलंकेचा क्रिकेटसंघ भारतदौऱ्यावर असतानाच विराटने विश्रांतीसाठी सुट्टी घेतल्यापासूनच त्यांच्या विवाहाच्या चर्चांना उधाण आले होते. शनिवारी अनुष्का सहकुटुंब मुंबई विमानतळावर दिसल्यानंतर तर या क्षणाची उत्सुकता अधिकच ताणली गेली होती. अखेर कोणतीही पूर्वघोषणा न करता विराट व अनुष्काने ट्विटरवरूनच विवाहाची ही बातमी जगजाहीर केली व सोबत आपल्या नव्या नात्याच्या प्रारंभाचे आनंदी छायाचित्रही चाहत्यांसाठी ट्विट केले. गुलाबी लेहेंगा परिधान केलेली अनुष्का व शेरवानी शोभणारा विराट यांचे हे छायाचित्र क्षणार्धात असंख्य चाहत्यांच्या मोबाइलवर झळकले. कोहली व शर्मा यांचे कुटुंबीय व निकटवर्तीय मित्रांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगला. देशभरातील कलावंत, खेळाडू, उद्योगपतींच्या उपस्थितीत २१ डिसेंबर रोजी नवी दिल्लीत व त्यानंतर २६ डिसेंबर रोजी मुंबईत स्वागत समारंभ होणार आहे. एका जाहिरातीच्या शुटिंगसाठी प्रथमच समोरासमोर आलेल्या या २९वर्षीय जोडप्याने चार वर्षांच्या मैत्रीला आता नव्या नात्यात गुंफले आहे.