अ‍ॅपशहर

पाणीकपात रद्द

जून आणि जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा जमा झाल्याचा दावा करत महापालिकेने मागील आठ महिन्यांपासून लागू केलेली दहा टक्के पाणीकपात शुक्रवारी मागे घेतली.

महाराष्ट्र टाइम्स 20 Jul 2019, 5:33 am
- १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर : वर्षभर विनाकपात पुरवठ्यासाठी आवश्यक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम watercolor canceled
पाणीकपात रद्द


- ७ लाख ४३ हजार ५३१ दशलक्ष लिटर : १९ जुलै, २०१९ रोजीचा साठा

- १० ते १२ लाख दशलक्ष लिटर : कपात मागे घेण्यासाठीचा पाणीसाठा

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

जून आणि जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा जमा झाल्याचा दावा करत महापालिकेने मागील आठ महिन्यांपासून लागू केलेली दहा टक्के पाणीकपात शुक्रवारी मागे घेतली. मात्र पालिकेच्या या निर्णयावर मुंबईकर व राजकीय पक्षांनी टीकेची झोड उठवली आहे. तलावात फक्त ५० टक्के पाणीसाठा जमा झाला असून, आणखी ५० टक्के साठ्याची गरज असताना इतक्या घाईघाईत कपात मागे घेण्याचा निर्णय चुकीचा असल्याची टीका करण्यात येत आहे.

मागील वर्षीच्या पावसात तलावांमध्ये एकूण क्षमतेच्या नऊ टक्के (२ लाख एमएलडी) पाणी कमी जमा झाले होते. त्यामुळे १५ नोव्हेंबर, २०१८पासून मुंबईत १० टक्के पाणीकपात करण्यात आली होती. यंदा जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर जुलैच्या पहिल्या दहा दिवसांत दमदार पाऊस पडल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पाणीसाठा वाढू लागला आहे. १५ जुलै रोजी पाणीसाठ्याचा आढावा घेण्यात आला, तेव्हा एकूण पाणीसाठ्याच्या ५१ टक्के साठा उपलब्ध असल्याचे आढळून आले. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत समाधानकारक पाऊस अपेक्षित आहे. सप्टेंबरअखेरपर्यंत सर्व तलाव पूर्ण भरतील, अशी शक्यता असल्याने आज, २० जुलैपासूनच पाणीकपात रद्द करण्यात येत असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

मुंबईला वर्षभर विनाकपात पाणीपुरवठा करण्यासाठी साडेचौदा लाख दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते. सातही तलावांमध्ये सध्या ७ लाख ४३ हजार दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला आहे. पुढील दोन महिन्यांत आणखी समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त करत राज्यमंत्री योगेश सागर यांनी पालिकेला पाणीकपात मागे घेण्याची विनंती केली होती. ती आयुक्त प्रवीण परदेशी यांनी मान्य केल्यानंतर कपात मागे घेत असल्याची घोषणा प्रशासनाने शुक्रवारी स्थायी समितीत केली. तलावात किमान १० ते १२ लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाल्यानंतर कपात मागे घ्यायला हवी होती, असे जाणकारांचे म्हणणे आहे. (प्रशासनासमोर आव्हान...)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज