अ‍ॅपशहर

Maharashtra Rain Update: आजपासून तीन दिवस राज्यभरात पावसाचा दांडिया, पाहा हवामन विभागाचा अंदाज

Weather Forecast: राज्यात सर्वत्र नवरात्रीचा उत्सव आहे. करोनाच्या दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त गणेशोत्सवानंतर आता नवरात्रीचा उत्सव होत आहे. पण आता पावसामुळे उत्सावत खोळंबा होण्याची शक्यता आहे. आधीच पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byसचिन फुलपगारे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Sep 2022, 5:19 pm
मुंबई : पावसामुळे यंदा राज्यातील (Rain Maharashtra) शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जाता जाताही पाऊस राज्याला झोडपून काढणार अशी शक्यता आहे. राज्यात सर्वत्र नवरात्रोत्सवाची धूम असताना गरबा आणि दांडियासाठी उत्साही नागरिकांचा पावसाने रंगाचा बेरंग होऊ शकतो. परतीच्या पावसाने मुंबईसह राज्यात बुधवारी अनेक ठिकाणी हजेरी लावली. राज्यात काही ठिकाणी जोरदार तर मुंबईसह उपनगरात हलक्या सरी कोसळल्या. आता आजपासून पुढील तीन दिवस राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम weather forecast
आजपासून तीन दिवस राज्यात पावसाचा दांडिया, पाहा काय आहे हवामान विभागाचा अंदाज ( प्रातिनिधिक फोटो )


परतीचा पाऊस सध्या राजस्थानात आहे. हा पाऊस अपक्षितपणे पुढे सरकलेला नाही. त्यामुळे आजपासून त्याची वाटचाल सुरू होईल. परतीचा पाऊस हा महाराष्ट्रात पुढील महिन्यात ५ ऑक्टोबरपर्यंत दाखल होणार आहे. पण एकूणच वेग पाहता विलंब होण्याची अधिक शक्यता आहे. हवामन खात्याने याबाबत माहिती दिली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात विजांसह पाऊस पडेल. तर शनिवारी कोकण, मध्ये महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

महाराष्ट्रात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता आहे. तर नंदुरबार, धुळे जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे, हवामान विभागाचे माजी अधिकारी माणिकराव खुळे यांनी ही माहिती दिली आहे.

राज्यात पावसाची बॅटिंग सुरुच राहणार, आयएमडीकडून तीन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज