अ‍ॅपशहर

Weather Update : महाराष्ट्रात तापमान वाढणार, उकाड्याची स्थिती कधीपर्यंत राहणार? पाहा हवामान विभागाचा अंदाज

Weather Forecast Mumbai Rains : यंदा मान्सून उशिराने भारतात दाखल झाला आहे. आता हा मान्सून महाराष्ट्रात कधी येणार याकडे सर्वांचे डोळे लागून आहेत. महाराष्ट्रात आगामी काही दिवसांत तापमान वाढण्याचा अंदाज आहे.

Contributed by Anuja.Chawathey@timesgroup.com |Authored byम. टा. प्रतिनिधी | Edited byसचिन फुलपगारे | महाराष्ट्र टाइम्स 10 Jun 2023, 7:29 am
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : घामाच्या धारा पुसत, पाण्याच्या बाटल्या संपवत मुंबईकरांनी शुक्रवारचा दिवस कसाबसा ढकलला. मुंबईमध्ये शुक्रवारी उष्णतेच्या लाटेप्रमाणे परिस्थिती जाणवली. सांताक्रूझचे कमाल तापमान ३६.७ अंश सेल्सिअस नोंदले गेले, तर कुलाब्यामध्ये ३६ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. आज, शनिवारीही वातावरणाची हीच स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे. रविवारनंतर यात थोडासा दिलासा मिळू शकतो. मान्सून दाखल होईपर्यंत महाराष्ट्रात तापमानवाढ होण्याचा अंदाजही भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम weather forecast of mumbai maharashtra
महाराष्ट्रात तापमान वाढणार, उकाड्याची स्थिती कधीपर्यंत राहणार? पाहा हवामान विभागाचा अंदाज

El Nino : भारतीयांची काळजी वाढवणारी बातमी, एलनिनोचं कमबॅक, मान्सूनवर परिणाम होणार का? चिंता वाढली
मुंबईमध्ये शुक्रवारी कुलाबा येथे ३५.२, तर सांताक्रूझमध्ये ३५.७ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. हे तापमान सरासरीपेक्षा अनुक्रमे १.५ आणि २ अंशांनी चढे होते. याआधी सन २०१९मध्ये जून महिन्यात कमाल तापमानाचा पारा ३६.६ अंश सेल्सिअस नोंदला गेला. त्याआधीच्या वर्षीही जूनमधील मुंबईतील सर्वाधिक कमाल तापमान ३६.१ अंश सेल्सिअस नोंदले गेले. सध्या चक्रीवादळामुळे वाऱ्यांची दिशा बदलली असून दक्षिणेकडून वारे येत असल्याने मुंबईमध्ये तापमानाचा पारा अधिक चढल्याचे प्रादेशिक हवामान विभाग अधिकारी सुषमा नायर यांनी सांगितले. यातच शुक्रवारी समुद्रावरून येणारे वारेही उशिरा आले. त्यामुळे या उकाड्यामध्ये आणि त्रासामध्ये भर पडल्याचेही त्या म्हणाल्या. प्रादेशिक हवामान विभागाने शुक्रवार आणि शनिवार या दोन्ही दिवसांसाठी उत्तर कोकणामध्ये उष्ण आणि आर्द्र स्थिती निर्माण होईल, असा इशारा दिला आहे. शुक्रवारी किमान तापमानाचा पाराही कुलाबा येथे २८.५, तर सांताक्रूझ येथे २९.२ अंश सेल्सिअस नोंदला गेला. त्यामुळे रात्रीही मुंबईकरांना दिलासादायक वातावरण अनुभवता आले नाही. चक्रीवादळाचा प्रवास आणखी पुढे सरकेपर्यंत उकाड्यातून फारशी सुटका नाही असे पूर्वानुमान आहे. त्यातच पूर्वमोसमी सरी आल्यास थोडा दिलासा मिळू शकेल.

महत्वाचे लेख