अ‍ॅपशहर

Weather Alert : महाराष्ट्रात ४८ तासांत पावसाचा इशारा, हवामान खात्याकडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Maharashtra Rain Update: राज्यात आता सर्वत्र पाऊस सक्रीय झाला असून हवामान खात्याकडून पुढचे काही दिवस राज्यात मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे कोणत्या जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे, वाचा सविस्तर...

Authored byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Jun 2022, 2:32 pm
मुंबई : राज्यात सध्या सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे नदी-नाले ओसांडून वाहत आहेत. काही ठिकाणी पावसामुळे बळीराजा सुखावला आहे तर काही ठिकाणी दुबारपेरणीचं संकट आहे. अशात हवामान खात्याकडून पुन्हा एकदा राज्याला मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा (Heavy Rainfall Alert) दिला आहे. IMD कडून पुढच्या ४८ तासांसाठी संपूर्ण राज्यात मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम maharashtra weather alert


Maharashtra Rain Update: राज्यात पुढचे काही दिवस पावसाचे असून अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोकणात मुसळधार पाऊस होऊ शकतो. आजपासून पुढचे दोन दिवस रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पुढच्या २४ तासांमध्ये कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांनाही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेत घराबाहेर पडावं तर शेतकऱ्यांनाही पिकाची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.



Ashadhi Wari 2022 Photos: एसटीमध्ये सापडली बेवारस पिशवी; पोलिसांनी उघडताच हादरले, आषाढी वारीमुळे चिंता वाढली

दरम्यान, हवामान खात्याकडून अहमदनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांनाही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी तुरळक पाऊस असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

खरंतर, राज्यात अहमदनगरमध्ये शिर्डी, नाशिक आणि सातार जिल्ह्यांमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. यामुळे नदी नाले तुडूंब भरले असून शेतकऱ्यांच्या शेतामध्येही पाणी शिरलं आहे. मुसळधार पावसामुळे नागरिकांचीही दाणादाण उडाली आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज