अ‍ॅपशहर

सुशांतसिंह प्रकरणाच्या निकालासाठी आम्ही देखील उत्सुक; गृहमंत्र्यांचा सीबीआयला टोला

जवळपास दीड महिन्यांनतर सीबीआयनं सुशांतसिंह आत्महत्याप्रकरणासंदर्भात निवेदन जारी केलं आहे. यावर अनिल देशमुख सीबीआयवर प्रश्न उपस्थित केले आहेत

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Sep 2020, 6:35 pm
मुंबईः अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपावण्यात आल्यानंतर जवळपास एक महिन्यांनी सीबीआयनं याबाबत निवेदन प्रसिद्ध केलं आहे. सीबीआयनं दिलेल्या माहितीच्या आधारे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम anil deshmukh


सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. तसंच, राज्यातील युवा मंत्र्याला वाटवण्यासाठी मुंबई पोलिस प्रयत्न करत असल्याचे आरोप सातत्याने होत होते. त्यानंतर, सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आला आहे. मात्र, जवळपास दीड महिना होत आला तरी सीबीआयच्या हाती काहीच ठोस पुरावे आले नाहीत. यावरून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीबीआय तपासाच्या निकालासाठी आम्हीही उत्सुक आहोत, असा टोला विरोधकांना लगावला आहे.

शिवसेनेला दूर ठेवण्यासाठी भाजप राष्ट्रवादी एकत्र? या निवडणुकीमुळं चर्चेला उधाण

'सुशांतसिंह प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस प्रोफेशनल पद्धतीने हाताळत होते. त्यानंतर हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. सीबीआय तपासाचा निकाल काय यासाठी आम्ही उत्सुक आहोत. सुशांतनं आत्महत्या केली की त्याची हत्या झाली?,' असे प्रश्न जनतेच्या मनात आहेत, असं अनिल देशमुख म्हणाले आहेत.


राष्ट्रवादीने एनडीएमध्ये यावे; रामदास आठवलेंची शरद पवारांना ऑफर

दरम्यान, सीबीआयनंही एक सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी एक अधिकृत निवेदन जारी केलं आहे. 'सुशांत प्रकरणात सीबीआय अद्याप कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेली नाही. सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास सुरू आहे,' असं सीबीआयनं म्हटलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज