अ‍ॅपशहर

पाचव्या मार्गिकेसाठी उड्डाणपूल

पश्चिम रेल्वेवर लोकल आणि मेल एक्सप्रेसची वाहतूक स्वतंत्रपणे होण्यासाठी वांद्रे येथील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या रखडलेल्या प्रकल्पात उड्डाणपुलाचा पर्याय शोधण्यात आला आहे. मुंबई सेंट्रल ते बोरीवलीपर्यंतच्या पाचवी-सहावी मा​र्गिका उभारण्याच्या महत्त्वाच्या प्रकल्पात ‘परे’ने उड्डाणपूल उभारून हा प्रश्न निकाली काढण्याचा निर्णय घेतला आहे.

Maharashtra Times 26 Sep 2016, 4:00 am
पश्चिम रेल्वेचा रखडलेला मार्ग मोकळा होणार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम western railway project
पाचव्या मार्गिकेसाठी उड्डाणपूल


म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

पश्चिम रेल्वेवर लोकल आणि मेल एक्सप्रेसची वाहतूक स्वतंत्रपणे होण्यासाठी वांद्रे येथील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या रखडलेल्या प्रकल्पात उड्डाणपुलाचा पर्याय शोधण्यात आला आहे. मुंबई सेंट्रल ते बोरीवलीपर्यंतच्या पाचवी-सहावी मा​र्गिका उभारण्याच्या महत्त्वाच्या प्रकल्पात ‘परे’ने उड्डाणपूल उभारून हा प्रश्न निकाली काढण्याचा निर्णय घेतला आहे.
पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेमुळे परेवर लोकल आणि मेल/एक्स्प्रेसची वाहतूक स्वतंत्रपणे करता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे मेल/एक्स्प्रेस गाड्या लोकल मार्गावरून जाणार नाहीत. त्यामुळे लोकल फेऱ्यांची संख्या वाढवण्यास मदत होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
‘परे’वरील विकास कामांसाठी एमयूटीपी अंतर्गत घेण्यात आलेल्या प्रकल्पात मुंबई सेंट्रल ते बोरीवलीपर्यंत पाचवी आणि सहावी मार्गिका उभारण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यापैकी, वांद्रे येथे पाचव्या मार्गिकेजवळ दफनभूमीची जागा असल्याने स्थानिकांकडून त्यात अडथळे येत आहेत. त्यातून चर्चा करून पर्याय दिल्यानंतरही मार्ग निघत नसल्याने परेने या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हा उड्डाणपूल उभारल्यानंतर पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम एकत्रितपणे हाती घेण्यात येणार आहे.
पाचव्या मार्गिकेसाठी वांद्रे ते सांताक्रूझमध्ये १.२ किमी लांबीचा मार्ग काढण्यात येणार आहे. पण, वांद्रे स्टेशनजवळ १०० मीटर अंतरावर दफनभूफी असल्याने त्यात अडथळा निर्माण झाला आहे. उड्डाणपुलामुळे स्थानिकांना दफनभूमीकडे जाण्याचा मार्ग उपलब्ध होणार असल्याचे परेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले.

कालावधी वाढणार!

उड्डाणपुलाचे काम झाल्यानंतर पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांचे एकत्रितरित्या केले जाणार आहे. त्यामुळे या प्रकल्पास काही वर्षांचा कालावधी लागणार असल्याची भीती आहे. आधीच हा प्रकल्प रखडल्याने त्यावर टीकेची झोड उठवली जात आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज