अ‍ॅपशहर

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

चर्चगेटकडून विरारकडे जाणाऱ्या लोकलच्या ओव्हर हेड वायरला एल्फिन्स्टन रोड जवळ शॉर्ट सर्किट झाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. पश्चिम रेल्वेच्या एल्फिन्स्टन रोडवरील स्थानकादरम्यान ओव्हर हेड वायरला शॉर्ट सर्किट झाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली

Maharashtra Times 28 Jun 2017, 7:28 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम western railway rout disrupted
पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत


चर्चगेटकडून विरारकडे जाणाऱ्या लोकलच्या ओव्हर हेड वायरला एल्फिन्स्टन रोड जवळ शॉर्ट सर्किट झाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

लोअर परळ आणि एल्फिन्स्टन दरम्यान झाडाची फांदी ओव्हरहेड वायरवर पडल्याने शॉर्ट सर्कीट झाले व त्यानंतर या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऑफीसमधून घरी परतण्यासाठी निघालेल्या मुंबईकर चाकरमान्यांना ऐन गर्दीच्यावेळी चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर नेहमीच वाहतूक विस्कळीत होते परंतु आज सातच्या सुमारास पश्चिम मार्गावर शार्ट सर्कीटमुळे पश्चिम मार्गावरील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

एल्फिन्स्टन स्थानकावर शॉर्ट सर्किट झाल्यानंतर पश्चिम रेल्वेच्या धीम्या मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक (अप आणि डाउन) खोळंबली असून या मार्गावर रेल्वेची वाहतूक २० मिनिटं उशिराने धावत आहे. गाड्यांना २० मिनिटं उशिर होत असल्याने अनेक स्टेशनवर गर्दी पाहायला मिळत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज