अ‍ॅपशहर

पश्चिम रेल्वेचा दिलासा; महिलांसाठी घेतला 'हा' मोठा निर्णय

Western Railway पश्चिम रेल्वेनं लोकलने प्रवास करणाऱ्या अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Sep 2020, 9:53 am
मुंबईः पश्चिम रेल्वेनं मुंबई व उपनगरांतील प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांची मोठी संख्येमुळं लोकलमध्ये गर्दी होताना दिसत आहे. यावर मार्ग काढण्यासाठी पश्चिम रेल्वेनं एक पाऊल टाकलं आहे. ( Mumbai Local Train Latest Updates )
महाराष्ट्र टाइम्स.कॉम western railway


मुंबईत सध्या फक्त अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांसाठी विशेष लोकल चालवल्या जात आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांच्या कामांतील वेळेतील साम्य लक्षात घेता लोकलमध्ये गर्दी टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. चर्चगेट ते विरार दरम्यान अत्यावश्यक महिला विशेष लोकल सुरु करण्यात येणार आहेत. सोमवार २८ सप्टेंबरपासून या लोकल फेऱ्या सुरू होतील. विरार- चर्चगेटसाठी सकाळी ७. ३५ची लोकल रवाना होणार आहे. तर, संध्याकाळी ६.१० वाजता चर्चगेट- विरार लोकल रवाना होणार आहे.

संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट; 'या' विषयावर झाली चर्चा

पश्चिम रेल्वे मार्गावर दररोज साडेतीनशे विशेष लोकल चालवल्या जात होत्या, प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेनं त्यात वाढ केली आहे. विशेष लोकलची संख्या दीडशेने वाढवून पाचशे केली आहे. करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सोशल डिस्टनसिंग पाळले जावे व लोकलमध्ये गर्दी होऊ नये या होऊ नये या हेतूने विशेष लोकलची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.


राज्याला मोठा दिलासा! विक्रमी २३ हजारांवर रुग्ण करोनामुक्त

दरम्यान, राज्य शासनाच्या निर्देशानुसार अत्यावश्यक प्रवर्गातील कर्मचारी वगळता इतर प्रवाशांना लोकलमध्ये प्रवेश नसेल. त्यामुळे अन्य कोणीही रेल्वे स्थानकांवर गर्दी करू नये, अशी विनंती पुन्हा एकदा रेल्वेने केली आहे. लोकलबाबत काही अफवा पसरवल्या जात असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. प्रवाशांनी कोविड-१९ च्या अनुषंगाने अनिवार्य करण्यात आलेल्या वैद्यकीय आणि सामाजिक प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करावे. प्रवासादरम्यान मास्क वापरावा, असेही नमूद करण्यात आले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज