अ‍ॅपशहर

उद्योगात उतरलं की अशा गोष्टींना तोंड द्यावंच लागतं: मनोहर जोशी

'उद्योग-व्यवसायात उतरलं की अशा प्रकारच्या गोष्टींना तोंड द्यावंच लागतं,' अशा मोजक्या शब्दांत शिवसेनेचे नेते व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी 'कोहिनूर'ला बजावण्यात आलेल्या ईडीच्या नोटिशीवर प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Aug 2019, 1:48 pm
मुंबई: 'उद्योग-व्यवसायात उतरलं की अशा प्रकारच्या गोष्टींना तोंड द्यावंच लागतं,' अशा मोजक्या शब्दांत शिवसेनेचे नेते व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी 'कोहिनूर'ला बजावण्यात आलेल्या ईडीच्या नोटिशीवर प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम what ex chief minister manohar joshi says on ed notice to kohinoor group
उद्योगात उतरलं की अशा गोष्टींना तोंड द्यावंच लागतं: मनोहर जोशी


'कोहिनूर स्क्वेअर'मधील कथित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे व कोहिनूर ग्रुपचे उन्मेष जोशी यांना नोटीस बजावली आहे. नोटीस मिळाल्यानंतर उन्मेष यांनी आज ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर हजेरी लावली. तब्बल दोन तासांहून अधिक वेळ त्यांची चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर 'कोहिनूर समूहा'चे संस्थापक मनोहर जोशी यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली.

'अचानक नोटीस येण्यामागे कदाचित काही काळंबेरं असूही शकतं. अर्थात, पूर्ण माहिती मिळेपर्यंत त्याबद्दल काही सांगणं योग्य नाही. बिझनेसमध्ये उतरलं की अशा गोष्टींना तोंड द्यावंच लागतं,' असं ते म्हणाले. कोहिनूर मिल प्रकरणात खरंच काही गैरव्यवहार झाला असेल असं वाटतं का असा प्रश्न विचारला असता, 'पूर्वी मी संस्था पाहत होतो. तेव्हा असं काही झालं नव्हतं. आता काही आहे का ते पाहावं लागेल,' असं मनोहर जोशी म्हणाले. उन्मेष जोशी हे सत्ताधारी व विरोधकांच्या राजकारणात भरडले जाताहेत असं वाटतं का, या प्रश्नावर मात्र त्यांनी मौन बाळगणं पसंत केलं.

विशेष काही नाही: संजय राऊत

'ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या आपल्या देशातील स्वायत्त संस्था आहेत. त्या आपापल्या पद्धतीनं काम करत असतात. त्यांना ते करू दिलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीकडं राजकारणाच्या दृष्टीनं बघणं योग्य नाही. मला या नोटिशींमध्ये काही विशेष वाटत नाही,' असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज