अ‍ॅपशहर

मेट्रोचे दरवाजे बंदच होत नहीत तेव्हा...

उपनगरीय लोकल सेवेच्या गोंधळाचा फटका प्रवाशांना अधून मधून बसत असतोच! गुरुवारी मेट्रोतील बिघाडामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे स्थानकावर मेट्रोच्या डब्याचा दरवाजा बंदच झाला नाही. त्यामुळे सर्व प्रवाशांना स्थानकांवर उतरवण्यात आले.

Maharashtra Times 30 Mar 2018, 3:00 am
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम metro


उपनगरीय लोकल सेवेच्या गोंधळाचा फटका प्रवाशांना अधून मधून बसत असतोच! गुरुवारी मेट्रोतील बिघाडामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे स्थानकावर मेट्रोच्या डब्याचा दरवाजा बंदच झाला नाही. त्यामुळे सर्व प्रवाशांना स्थानकांवर उतरवण्यात आले.

सकाळी पावणेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला. घाटकोपरहून वर्सोव्याच्या दिशेने निघालली मेट्रो वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर आली. दरवाजा उघडला, प्रवासी आत आले. काही सेकंदाने दरवाजा बंद होणे अपेक्षित असते. मात्र बराच वेळ दरवाजा बंदच झाला नाही. त्यामुळे प्रवाशांची रखडपट्टी झाली. बिघाड झालेल्या गाडीला डेपोत नेण्यात आले आणि प्रवाशांसाठी दुसऱ्या गाडीची व्यवस्था करण्यात आली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज