अ‍ॅपशहर

उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर सगळं सांगेन; खडसेंचं सूचक वक्तव्य

भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्यामुळं त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेला उधाण आलं आहे. या चर्चेवर सूचक प्रतिक्रिया देताना, 'उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर सर्व काही सांगेन,' असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळं त्यांच्या पुढील भूमिकेबाबत सस्पेन्स वाढला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Dec 2019, 5:06 pm
मुंबई: भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्यामुळं त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेला उधाण आलं आहे. या चर्चेवर सूचक प्रतिक्रिया देताना, 'उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर सर्व काही सांगेन,' असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळं त्यांच्या पुढील भूमिकेबाबत सस्पेन्स वाढला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Eknath-Khadse


पक्षांतर्गत कारस्थानामुळे नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिल्लीत येऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. सुमारे अर्धा तास या दोन्ही नेत्यांमध्ये खलबतं झाली. पवार यांची भेट घेतल्यानंतर खडसे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याने खडसेंच्या या भेटीगाठींबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क वर्तविले जात आहेत. विशेष म्हणजे खडसे दिल्लीत भाजप नेत्यांना भेटायला आले होते. त्यांनी दिल्लीत पोहोचल्यावर तसं सांगितलंही होतं. पण भाजप नेत्यांऐवजी पवारांचीच भेट घेऊन ते परतत असल्याने राजकीय चर्चांना अधिक उधाण आलं होतं.

मुंबईचा पुढील महापौर भाजपचा; चंद्रकांत पाटलांचा दावा

आता नेहरू, गांधींना दोष देता येणार नाही; शिवसेनेचा भाजपला टोला

पवारांच्या भेटीनंतर आज सकाळी खडसे यांनी भाजपच्या दुसऱ्या नाराज नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेतली. त्या भेटीनंतर वृत्तवाहिन्यांकडं त्यांनी संवाद साधला. आज भाजपच्या कोअर कमिटीची मुंबईत बैठक झाली. त्यात खडसे यांची नाराजी दूर करण्याबद्दल चर्चा झाल्याचं सांगितलं जात होतं. त्याबाबत विचारलं असता ते म्हणाले, 'मी भाजपच्या कोअर कमिटीचा सदस्य नाही. मला काढले आहे की नाही हेही मला माहीत नाही. पंकजा मुंडेंच्या भेटीमागे शक्तिप्रदर्शनाचा संबंध नाही. गोपीनाथ मुंडे हे मोठे नेते होते. राजकीय कारणासाठी या भेटीचा वापर होऊ नये. मुंडेंच्या जयंती दिनाच्या कार्यक्रमासंदर्भात चर्चा करण्यासाठी मी पंकजांची भेट घेतली. इथं नाराजीचा विषय नव्हता. आज उद्धव ठाकरे यांना भेटणार आहे. त्यांच्याशी भेटल्यावर काय ते सांगेन.'

स्वप्नातही बडबडायचो, मुख्यमंत्री शिवसेनेचाच: संजय राऊत

महिलांवरील अत्याचारांवर तातडीने कारवाईः मुख्यमंत्री

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज