अ‍ॅपशहर

पश्चिम महाराष्ट्रात २४ तासांत वादळी पाऊस!

कडक उन्हामुळे जीवाची काहिली होत असेल तर आता फक्त थोडीशी कळ सोसा. येत्या ४८ तासांत पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचं आगमन होणार आहे. भारतीय हवामान खात्यानं ही आनंददाची बातमी दिलीय.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 May 2018, 3:09 pm
मुंबई: कडक उन्हामुळे जीवाची काहिली होत असेल तर आता फक्त थोडीशी कळ सोसा. येत्या ४८ तासांत पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचं आगमन होणार आहे. भारतीय हवामान खात्यानं ही आनंददाची बातमी दिलीय.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम windy rain in 24 hours in western maharashtra marathwada
पश्चिम महाराष्ट्रात २४ तासांत वादळी पाऊस!


पुण्यात पावसाने आधीच दस्तक दिलेली असताना येत्या २४ तासांत पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाचं आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. पुणे, अहमदनगर, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूरसह मराठवाड्यातील उस्मानाबाद, नांदेड, लातूर आदी भागांत गडगडटांसह वादळी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. कोकणातही वादळी पावसाला सुरुवात झाली असून कोकणातही येत्या ४८ तासांत वादळी वारे व गडगडाटासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असल्यामुळे ग्रामस्थांना आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना हवामान खात्याने दिल्या आहेत.

मान्सून २८ मे रोजी केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला आहे. मान्सून २० मे रोजी अंदमान आणि निकोबार बेटावर पोहोचेल. यानंतर तो २४ मे रोजी श्रीलंकेत दाखल होईल आणि त्यानंतर बंगालच्या उपसागरावरुन मान्सूनचा प्रवास सुरू होईल, असा स्कायमेटचा अंदाज आहे. मान्सून अपेक्षेपेक्षा चार दिवस आधीच केरळमध्ये दाखल होईल, असा स्काटमेटचा अंदाज आहे. केरळमध्ये मान्सून साधारणत: एक जूनला दाखल होतो. मात्र यंदा तो चार दिवस आधीच केरळमध्ये पोहोचणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज