अ‍ॅपशहर

'प्रेयसी'ने केले 'प्रेयसी'चे नग्न फोटो व्हायरल!

एका ४५ वर्षांच्या महिलेने आपल्या माजी प्रेयसीविरोधात तक्रार केली आहे. या प्रेयसीने आपल्या तक्रारदार प्रेयसीचे नग्नावस्थेतले छायाचित्र सोशल मिडियावर पोस्ट केले. न्यायालयाने या 'प्रेयसी'चा जामीन अर्ज फेटाळला आहे.

Maharashtra Times 28 Feb 2017, 1:03 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम woman takes ex girlfriend to court for posting her nude photo online
'प्रेयसी'ने केले 'प्रेयसी'चे नग्न फोटो व्हायरल!


तुम्ही बरोबर वाचत आहात.. प्रेयसीनेच प्रेयसीची तक्रार केली आहे. एका ४५ वर्षांच्या महिलेने आपल्या माजी प्रेयसीविरोधात तक्रार केली आहे. या प्रेयसीने आपल्या तक्रारदार प्रेयसीचे नग्नावस्थेतले छायाचित्र सोशल मिडियावर पोस्ट केले. न्यायालयाने या 'प्रेयसी'चा जामीन अर्ज फेटाळला आहे.

दोघींमध्ये गेले १० वर्षे प्रेमसंबंध होते. दोघीही मुंबईतल्या एका प्रसिद्ध रुग्णालयात पॅथेलॉजी विभागात काम करतात. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ही अशी पहिलीच केस आहे, ज्यात समलिंगी पार्टनरने आपल्याच प्रेयसीविरोधात तक्रार केली आहे. मुलुंडच्या नवघर पोलीस ठाण्यात ४ फेब्रुवारीला ही तक्रार दाखल झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघीजणी खूप वर्षे एकमेकांना ओळखत होत्या. यापैकी एक विवाहित होती. पण तिचे लग्न मोडल्यावर दोघी आणखी जवळ आल्या. नंतर दोघी मुलुंडजवळ एका घरात राहू लागल्या.

गेल्या ६ महिन्यांपासून दोघींमध्ये वाद निर्माण झाले होते. यादरम्यान तक्रारदार महिलेला कळले की गेली २ वर्षे तिची छायाचित्रे फेसबुकवर वापरण्यात येत होती. मागील वर्षी २१ नोव्हेंबरला तिला कळले की तिच्या प्रेयसीनेच तिची नग्नावस्थेतली छायाचित्रे आपल्या फेसबुक अकाउंटवरून शेअर केली आणि आपल्या व्हॉट्स अॅप अकाउंटचे प्रोफाइल म्हणूनही यातलेच एक छायाचित्र ठेवले.

तक्रारदार महिलेचे म्हणणे आहे की ही छायाचित्रे अंघोळीच्या वेळी घेतली गेली होती. यावरून दोघींमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यानंतर तिच्या या प्रेयसीने ही छायाचित्रे सार्वजनिक करण्याची धमकी दिली आणि घर सोडले. खूप वेळा मागूनही तिने ती छायाचित्रे दिली नाहीत तेव्हा या महिलेने पोलिसांकडे तक्रार केली.

पोलिसांनीच या प्रेयसी महिलेच्या जामीनाला विरोध केला आहे. दोघी एकाच ठिकाणी काम करतात, त्यामुळे तक्रारदार महिलेला त्रास होऊ शकतो, असे पोलिसांना वाटते. अद्याप तिचा मोबाइलदेखील हस्तगत केलेला नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज