अ‍ॅपशहर

भीक मागणाऱ्या महिलेकडे चोरीचे मूल

ओशिवरा येथील मशिदीबाहेर भीक मागणाऱ्या मनिषा काळे या महिलेला ओशिवरा पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून सहा महिन्याच्या चिमुरड्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून ही मूल तिने पुण्याहून चोरी करून आणल्याचे समोर आले आहे.

महाराष्ट्र टाइम्स 23 Aug 2018, 7:23 am
मशिदीबाहेर ओशिवरा पोलिसांनी पकडले
महाराष्ट्र टाइम्स.कॉम oshiwara-police


म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

ओशिवरा येथील मशिदीबाहेर भीक मागणाऱ्या मनिषा काळे या महिलेला ओशिवरा पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून सहा महिन्याच्या चिमुरड्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून ही मूल तिने पुण्याहून चोरी करून आणल्याचे समोर आले आहे.

बकरी ईदनिमित्त मुंबई पोलिसांचा सर्व मशिदींबाहेर कडक बंदोबस्त होता. मिल्लत नगर मशिदीबाहेर ओशिवरा पोलिसांची गस्त सुरू असताना या ठिकाणी भीक मागणाऱ्या एका महिलेची हालचाल संशयास्पद असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी या महिलेची चौकशी केल्यानंतर तिने स्वत:चे नाव मनिषा काळे असल्याचे सांगितले. पण तिच्याकडे असलेल्या सहा महिन्याच्या चिमुरड्याबाबात ती उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली. ते मूलही तिच्याकडे राहत नव्हते. खोलात जाऊन चौकशी केली त्यावेळी हे मूल पुणे येथून चोरल्याचे तिने सांगितले.

पुणे मंडई परिसरात असलेली एक महिला आपल्या मुलांसह पुणे रेल्वे स्थानकावर १७ ऑगस्ट रोजी होती. फलाट क्रमांक दोन वरून मूल चोरीला गेल्याची तक्रार तिने पुणे रेल्वे पोलिसांकडे केली आहे. ओशिवरा पोलिसांनी याबाबत पुणे रेल्वे पोलिसांकडून चौकशी करून या माहीतीची शहानिशा केली. मनिषा हिने आणखी काही मुले चोरली असावीत असा पोलिसांनी संशय आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज