अ‍ॅपशहर

'या' मशिदीत महिला करतात नमाज पठण

तीन तलाकसारख्या प्रथेविरुद्ध लढणाऱ्या मुस्लिम समाजातील महिलांना बळ देणारं पाऊल मुंबईतील यारी रोड येथील एका मशिदीनं उचललं आहे. या मशिदीमध्ये शिया महिलांना उलेमाची भूमिका पार पाडण्याची परवानगी देण्यात आली आहे. मौलाना मोहम्मद फयाज बाकरींची पत्नी उज्मा या येथे उलेमा म्हणून सेवा देत आहेत.

Maharashtra Times 16 Aug 2017, 3:10 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम yari road mosque opens door to women ulemas
'या' मशिदीत महिला करतात नमाज पठण


तीन तलाकसारख्या प्रथेविरुद्ध लढणाऱ्या मुस्लिम समाजातील महिलांना बळ देणारं पाऊल मुंबईतील यारी रोड येथील एका मशिदीनं उचललं आहे. या मशिदीमध्ये शिया महिलांना उलेमाची भूमिका पार पाडण्याची परवानगी देण्यात आली आहे. मौलाना मोहम्मद फयाज बाकरींची पत्नी उज्मा या येथे उलेमा म्हणून सेवा देत आहेत.

शुक्रवारच्या दिवशी मशिदीत कुराणाचं पठण आजही मौलानाच करतात. मात्र, यारी रोड येथील मशिदीमध्ये हे काम महिला उलेमा करतात. एका महिलेला शिकवणं म्हणजे संपूर्ण कुटुंबाला शिक्षण देण्यासारखं आहे. एक कुटुंब शिकतं, तेव्हा तो समाजही शिक्षित होतो. कुराण कसं वाचावं, लहान मुलांचं पालनपोषण कसं करावं, मुलींचं शिक्षण का महत्त्वाचं आहे, एक चांगला माणूस कसं बनता येईल यासारखे अनेक विषय या महिलांना शिकवले जातात. मौलाना मोहम्मद फय्याज बाकरींची पत्नी उज्मा यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. 'दीन' (धर्माचं ज्ञान) आणि 'दुनिया' (विश्व) यावर इस्लामचा विश्वास असून यांच्यात समतोल कसा साधावा, याबद्दल त्या मार्गदर्शन करतात.

उज्मा सांगतात, 'मी मशिदीमध्ये कुराणाचे वर्ग घेते. ५ ते १५ वर्षापर्यंतच्या मुलींना कुराण आणि त्याचं महत्त्व समजावून सांगते. यात नमाज पठण कसं करावं; इस्लाम धर्माचं पालन कसं करावं, या गोष्टींचा समावेश आहे.

'द इस्लामिक स्टडीज फॉर डायलॉग'च्या महासंचालक डॉ. जीनत शौकत अली यांनी याबाबत आपलं मत व्यक्त करताना मुस्लिम महिलांच्या दृष्टीनं हे एक चांगलं पाऊल असल्याचं म्हटलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज