म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या मैत्रिणीची तरुणाने हत्या केल्याची घटना वाकोला परिसरात घडली. मरिना लालमन स्वामी (३०) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून, तिचा मित्र रामसेन कुरिओ (२०) याला वाकोला पोलिसांनी अटक केली आहे. चारित्र्याच्या संशयावरून रामसेन याने मरिना हिचा खून केल्याचे समोर आले आहे. दोघेही मिझोरमचे असून, ते दीड वर्षे एकत्र राहत होते. सोमवारी रात्री त्यांच्यात भांडण झाले आणि कुरिओने तिला बेदम मारहाण केली. यात तिचा मृत्यू झाला.