अ‍ॅपशहर

‘त्यां’च्यासाठी बनणार आजी-आजोबा सांता

रात्रीच्या वेळी बाराच्या ठोक्याला मिळणारे गिफ्ट, सांता क्लॉजची टोपी, पार्टीची धम्माल यासाठी बच्चेकंपनी आतूर असते; पण सगळ्यांनाच हा आनंद मिळतोच असं नाही. रस्त्यावर राहणारे गरीब तरुण, अनाथाश्रमातील विद्यार्थी यांना हा आनंद मिळत नाही. त्या मुलांना आनंद देण्यासाठी आजी-आजोबा पुढे सरसावले आहेत. सांताबाबा म्हणून आजी-आजोबा या मुलांना भेटून ही अनोखी भेट देणार आहेत.

Maharashtra Times 25 Dec 2017, 4:19 am
आदित्य बिवलकर, मुंबई विद्यापीठ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम young senior story
‘त्यां’च्यासाठी बनणार आजी-आजोबा सांता


रात्रीच्या वेळी बाराच्या ठोक्याला मिळणारे गिफ्ट, सांता क्लॉजची टोपी, पार्टीची धम्माल यासाठी बच्चेकंपनी आतूर असते; पण सगळ्यांनाच हा आनंद मिळतोच असं नाही. रस्त्यावर राहणारे गरीब तरुण, अनाथाश्रमातील विद्यार्थी यांना हा आनंद मिळत नाही. त्या मुलांना आनंद देण्यासाठी आजी-आजोबा पुढे सरसावले आहेत. सांताबाबा म्हणून आजी-आजोबा या मुलांना भेटून ही अनोखी भेट देणार आहेत. मुंबई, ठाणे, डोंबिवली येथे काही ज्येष्ठ नागरिक मंडळी हा उपक्रम राबविणार आहेत.

डोंबिवलीतील ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून हा अभिनव प्रयोग राबविण्यात येणार आहे. डोंबिवली ज्येष्ठ नागरिक संघामध्ये अंदाजे ३५० सभासद आहेत. २५-२६ तारखेला या ज्येष्ठ नागरिक संघामधील काही आजी-आजोबा शहरातील आजूबाजूच्या भागांमध्ये जाणार आहेत. या भागातील अनाथाश्रम, अपंगालय येथे भेट देऊन त्या मुलांसोबत नाताळ साजरा करण्यात येणार आहे.

पारंपरिक सांता क्लॉजच्या वेशामध्ये ज्येष्ठ नागरिक तयार होऊन अनाथालयामध्ये जाणार आहेत. याचबरोबर या मुलांना सातत्याने भेटून त्यांच्याशी मैत्री करण्याचा ज्येष्ठ नागरिकांचा प्रयत्न आहे. त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे चार क्षण दिसावेत म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे मंडळाचे सदस्य विशाल जोशी यांनी सांगितले. सुयोग, चेतना या शाळांमध्येसुद्धा भेटी देण्याचा संस्थेचा मानस आहे. याच धर्तीवर मुंबईमध्येसुद्धा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या मुलांना भेटून त्यांच्याशी गप्पा मारून सेलिब्रेशन करण्यात येणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज