अ‍ॅपशहर

अनुष्का आणि विराटला ‘त्या’ तरुणाची नोटीस

कारमधून प्लास्टिकचे आवरण रस्त्यात टाकल्यानंतर अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने शाब्दिक डोस दिल्याने आणि त्यासंदर्भातील व्हिडीओ क्रिकेटपटू विराट कोहलीने सोशल मीडियावर टाकल्याने चर्चेत आलेल्या अरहान सिंग या तरुणाने आता या दोघांनाही कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

Maharashtra Times 25 Jun 2018, 6:48 am
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम notice


कारमधून प्लास्टिकचे आवरण रस्त्यात टाकल्यानंतर अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने शाब्दिक डोस दिल्याने आणि त्यासंदर्भातील व्हिडीओ क्रिकेटपटू विराट कोहलीने सोशल मीडियावर टाकल्याने चर्चेत आलेल्या अरहान सिंग या तरुणाने आता या दोघांनाही कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

मुंबईतील एका रस्त्यावर घडलेल्या या घटनेविषयीचा व्हिडीओ विराटने १६ जून रोजी ट्विटरवर अपलोड केला होता. तो काही मिनिटांतच 'व्हायरल' झाला होता. काहींनी रस्त्यावर अस्वच्छता करणाऱ्या अरहानला खडे बोल सुनावल्याबद्दल अनुष्काने कौतुक केले होते. तर काहींनी हा निव्वळ प्रसिद्धी मिळवण्याचा प्रकार आहे, असे म्हणत त्या व्यक्तीला चांगल्या पद्धतीनेही सांगता आले असते, अशा प्रतिक्रिया व्यक्त केली होती. परंतु, 'या दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली अवहेलना केली', असे म्हणत अरहानने या दोघांनाही कायदेशीर नोटीस बजावली आहे. 'माझ्या कायदेशीर सल्लागारांनी विराट व अनुष्काला नोटीस पाठवली आहे. आता बॉल त्यांच्या कोर्टात आहे. त्यांच्या उत्तराची मी प्रतीक्षा करत आहे', अशी प्रतिक्रिया अरहानने यासंदर्भात एका वृत्तसंस्थेला दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज