अ‍ॅपशहर

आदित्य ठाकरेंचे विद्यापीठ, शिक्षण विभागावर ताशेरे

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना राज्यपालांनी निकालासाठी ३१ जुलै ही डेडलाइन दिली होती. आज सोमवारी ( ३१ जुलै) ही डेडलाइन संपली आहे. हा मुद्दा उपस्थित करत युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी विद्यापीठ आणि शिक्षण विभागावर ट्विटच्या माध्यमातून कडक ताशेरे ओढले आहेत.

Maharashtra Times 31 Jul 2017, 9:52 pm
मटा ऑनलाइन वृत्त। मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम yuva sena chief aditya thackeray criticises mumbai university and state education department for not keeping deadline given by chancellor
आदित्य ठाकरेंचे विद्यापीठ, शिक्षण विभागावर ताशेरे


मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना राज्यपालांनी निकालासाठी ३१ जुलै ही डेडलाइन दिली होती. आज सोमवारी ( ३१ जुलै) ही डेडलाइन संपली आहे. हा मुद्दा उपस्थित करत युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी विद्यापीठ आणि शिक्षण विभागावर ट्विटच्या माध्यमातून कडक ताशेरे ओढले आहेत.

आदित्य ठाकरे आपल्या मराठी आणि इंग्रजी भाषांमधील ट्विट्द्वारे आज ३१ जुलै असल्याची आठवण करुन देत राज्यपालांनी दिलेली डेडलाइन संपली तरी सर्व निकाल लागलेले नाहीत याकडे लक्ष वेधलंय. हा राज्यपालांचा अपमान असून विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा सरकारकडून केलेला खेळ असल्याचेही त्यांनी पुढे म्हटले आहे. असा भोंगळ कारभार कधीही कुणीही या अगोदर पाहिला नव्हता. हा लाजिरवाणा कारभार इतका कसा खालावला असा प्रश्न पडतो असेही त्यांनी पुढे म्हटले आहे.

हा माननीय चॅन्सलरांचा अपमान आहेच, तसेच विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा सरकार कडून केलेला खेळ देखील आहे. — Aaditya Thackeray (@AUThackeray) July 31, 2017 १०९ दिवस उलटूनही , एवढे स्वप्नातील अत्याधुनिक ऑनलाइन विद्यापीठ निकाल का नाही लावू शकले?, असेही ठाकरे यांनी ट्विटद्वारे विचारले आहे. निकाल जरी आता आले, तरी देखील मार्कशीच महत्त्वाच्याच असतात, मग त्याचे काय? असे ट्विट करत ठाकरे यांनी विद्यापीठाचे अपयश अधोरेखित केले आहे.

असा भोंगळ कारभार कधीही, कोणीही आधी पाहिला नव्हता. लाजिरवाणा कारभार एव्हढा खालावला कसा, हा प्रश्न पडतो. — Aaditya Thackeray (@AUThackeray) July 31, 2017 या प्रकरणावर आदित्य ठाकरे यांनी काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. मार्कशीट कधी मिळणार असा प्रश्न विचारताना ठाकरे यांनी निर्माण झालेल्या गोंधळाला जबाबदार कोण आणि पेपर तपासणीचे टेंडर कोणाला आणि कसे दिले असे प्रश्नही उपस्थित केले आहेत. हा घोटाळा आहे का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

पुनर्तपासणीची फी माफ करावी , त्याच प्रमाणे पदव्युत्तर आणि परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हेल्प डेस्क सुरू करण्यात यावा अशा मागण्याही ठाकरे यांनी केल्या आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज