अ‍ॅपशहर

झहिर खानचे 'चक दे' गर्ल सागरिका घाटगेसोबत डेटिंग

क्रिकेटपटू युवराज सिंग आणि हेजल कीच यांच्या लग्नात जसे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा जोडीने लक्ष वेधून घेतले होते, तसेच आणखी एका जोडीवर सर्वांच्या नजरा रोखलेल्या होत्या. ते होते क्रिकेटपटू झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे. ही दोघंही एकमेकांच्या प्रेमात असल्याची चर्चा आहे, अर्थात त्यांनी अद्याप याबाबत वाच्यता केलेली नाही.

Maharashtra Times 6 Dec 2016, 11:09 am
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम zaheer khan is dating chak de girl sagarika ghatge
झहिर खानचे 'चक दे' गर्ल सागरिका घाटगेसोबत डेटिंग


क्रिकेटपटू युवराज सिंग आणि हेजल कीच यांच्या लग्नात जसे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा जोडीने लक्ष वेधून घेतले होते, तसेच आणखी एका जोडीवर सर्वांच्या नजरा रोखलेल्या होत्या. ते होते क्रिकेटपटू झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे. ही दोघंही एकमेकांच्या प्रेमात असल्याची चर्चा आहे, अर्थात त्यांनी अद्याप याबाबत वाच्यता केलेली नाही.

गोलंदाज झहीर खानचे या 'चक दे इंडिया' फेम अभिनेत्री सागरिका घाडगेसोबत मागील चार महिन्यांपासून सुत जुळले आहे. कॉमन मित्रांमुळे या दोघांची ओळख झाली आणि बघता बघता ती दोघं एकमेकांच्या प्रेमात पडली. अनेक पार्ट्यांना दोघे एकत्र दिसले आहेत. दोघांनीही युवराजच्या लग्नालाही हजेरी लावली होती. दोघेही आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत गुप्तता बाळगणे पसंत करत असल्याने इतक्यात आपल्या रिलेशनशीपबद्दल काही जाहीरपणे सांगण्याची शक्यता नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज