अ‍ॅपशहर

नागपूरमधील करोनाबाधितांची संख्या ३००च्या उंबरठ्यावर

नागपूर शहरातील करोना विषाणूच्या साखळीचा विळखा आणखी घट्ट होत आहे. शहरातील एकूण करोनाबाधितांची संख्या २९५ इतकी झाली आहे. तर दुसरीकडे नऊ जण बरे झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 May 2020, 5:24 pm
म. टा. प्रतिनिधी, नागपूर: करोना विषाणूचा विळखा शहराभोवती चौफेर वाढतो आहे. बजाजनगरातून सुरू झालेली ही करोना प्रादुर्भाव साखळी खामला, जरिपटका, सतरंजीपुरा, मोमिनपुरा मार्गे आता पार्वतीनगर, शताब्दीनग पांढराबोडी असा वळसा घालून जवाहरनगरपर्यंत येऊन थांबली आहे. या विषाणू प्रादुर्भावाने आतापर्यंत २९५ जणांना विळखा घालत, त्रिशतकापासून अवघ्या पाच पावलांवर येऊन थांबला आहे. त्यामुळे नागपुरकरांच्या उरात भरलेल्या धडकीची तीव्रता दिवसागणिक वाढत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम covid 19


गेल्या २४ तासांत अहवाल प्राप्त झालेल्यांमध्ये २ जण शनिवारी मध्यरात्री पॉझिटिव्ह आढळले. तर रविवारी सात जणांची पुन्हा मेडिकलच्या प्रयोगशाळेत करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. या व्यतिरिक्त माफ्सूच्या प्रयोगशाळेत तीन आणि एम्सच्या प्रयोगशाळेत एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. धक्कादायक बाब म्हणजे पार्वतीनगरात करोनाचा संसर्ग झाल्याने दगावलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या साखळीत रविवारी आणखी एकाची वाढ झाली. त्यामुळे या रुग्णाच्या सहवासात आल्याने करोना प्रादुर्भाव झालेल्यांची संख्याही आता पाचपर्यंत गेली आहे. या खेरीज रविवारी गेल्या २४ तासांत आणखी १२ जण या प्रादुर्भाव शृंखलेत जोडले गेले. त्यापैकी पॉझिटिव्ह आलेला एक जण दक्षिण नागपूरचा भाग असलेल्या अयोध्यानगरच्या परिघातील जवाहर नगरातील आहे. त्यामुळे दहशतीने आता आपला मुक्काम या परिसरात हलविला आहे. सोबतच मोमिनपुरा करोना प्रादुर्भाव साखळीत आणखी तिघांची भर पडली. त्यामुळे आतापर्यंत शहरात करोनाचा विळखा पडलेल्यांची संख्या २९५ वर पोहोचली आहे.

आणखी नऊ जणांना डिस्चार्ज

या घडामोडीत करोनावर यशस्वी मात केल्याने मेडिकलच्या कोव्हीड-१९ वॉर्डातून सतरंजीपुरा, मोमिनपुरा येथील आणखी ९ जणांना सुटी देऊन घरी पाठविण्यात आले. या ९ करोनाबाधित रुग्णांमध्ये ४०, ४२, २३, ३१, ३२ आणि ६० वर्षीय वयोगटातील सहा पुरुषांसह ३७, २५, १५ वर्षीय महिलांचा समावेश आहे. त्यामुळे आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची संख्या नागपुरातील ८४ वर गेली आहे.

औरंगाबादमध्ये ८ जण करोनामुक्त

शहरात आणखी १२ बाधित नव्याने आढळले असून, जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ५५७ झाली आहे. तसेच आज ८ करोनाबाधित हे करोनामुक्त झाले असून, उपचारानंतर घरी परतले आहेत. त्यामुळे आतापर्यंत करोनामुक्त झालेल्यांची संख्या ७३ झाली आहे.

Live : खुशखबर! गेल्या २४ तासांत १० राज्यांत एकही नवीन रुग्ण नाही

हिंगोलीत तृतीयपंथी बनले 'करोना वॉरियर्स'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज