अ‍ॅपशहर

'त्या' चिमुरड्यानं १ मिनिटात सांगितली ५१ स्पेलिंग

आपण जेव्हा चार वर्षांचे होते, तेव्हा आपल्याला किती स्पेलिंग येत होत्या?... बहुतांशी जणांना स्वतःच्या नावाचं स्पेलिंगही येत नसेल; बरोबर ना?... पण, नागपूरमधील नर्सरीत शिकणाऱ्या एका चिमुरड्यानं एका मिनिटात तब्बल ५१ वस्तूंच्या स्पेलिंग सांगण्याची किमया केली आहे.

Maharashtra Times 24 May 2016, 4:23 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नागपूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 year old boy spells reverse counts his way into record books
'त्या' चिमुरड्यानं १ मिनिटात सांगितली ५१ स्पेलिंग


आपण जेव्हा चार वर्षांचे होते, तेव्हा आपल्याला किती स्पेलिंग येत होत्या?... बहुतांशी जणांना स्वतःच्या नावाचं स्पेलिंगही येत नसेल; बरोबर ना?... पण, नागपूरमधील नर्सरीत शिकणाऱ्या एका चिमुरड्यानं एका मिनिटात तब्बल ५१ वस्तूंच्या स्पेलिंग सांगण्याची किमया केली आहे.

आता दुसरं एक आव्हान. १०० ते शून्य आकडे तुम्ही ७० सेकंदांत म्हणू शकता? कठीणच आहे ना? पण तेही या चार वर्षांच्या मुलानं सहज करून दाखवलंय. अचाट बुद्धिमत्तेचं वरदान लाभलेल्या या मुलाचं नाव आहे, वरद मालखंडाळे. त्याच्या या विक्रमाची नोंद 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये करण्यात आली आहे.

आपल्या मुलाची स्मरणशक्ती अफाट आहे, त्याच्यावर थोडी मेहनत घेतल्यास तो काहीतरी कमाल करून दाखवू शकतो, हे वरदच्या आई-बाबांनी अचूक हेरलं आणि काही साधे-सोपे प्रयोग करण्यास सुरुवात केली. लहानपणी मुलांची ग्रास्पिंग पॉवर प्रचंड असते. त्याचा योग्य वापर करून त्यांनी वरदला वस्तूंची ओळख, स्पेलिंग, आकड्यांची ओळख करून दिली आणि आज त्यांच्या प्रयत्नांना आलेलं यश सबंध देश पाहतोय.

सोमलवाडा येथील नारायणा विद्यालयात शिकणाऱ्या वरदने एका मिनिटांत ४१ वस्तूंची स्पेलिंग सांगण्याची किमया याआधी केली होती, पण तो विक्रम मोडून काढत यावेळी त्यानं ५१ वस्तूंची स्पेलिंग फाडफाड सांगून सगळ्यांना थक्क करून टाकलं. पाठोपाठ, १०० ते ० आकडे त्यानं अवघ्या ७० सेकंदांत म्हणून दाखवले. खरं तर त्याचं वय पाहता त्याला ९० सेंकंदांपर्यंत वेळ देण्यात आला होता. पण, २० सेकंद आधीच त्यानं ही उलटगणना संपवली.

इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नाव येण्याची वरदची ही दुसरी वेळ आहे. याआधी ४ ऑक्टोबर २०१५ मध्ये वरदनं एका मिनिटांत ५१ कारची मॉडेल्स ओळखून दाखवली होती. तीन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये तीन राष्ट्रीय विक्रमांची नोंद वयाच्या चौथ्या वर्षीच करणारा वरद हा एकमेव मुलगा आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज