अटकेतील गुन्हेगार व जप्त तलवारींसह पाचपावली पोलिस.
नागपूर : पाचपावली पोलिसांनी विविध ठिकाणांहून तीन गुन्हेगारांना अटक करीत त्यांच्याकडून तलवारींसह शस्त्रसाठा जप्त केला. प्रिन्स रवी चहांदे (वय २५, रा. लष्करीबाग), कुंदन अज्जू उईके (वय २४, रा. इंदोरा चौक) व रियान रवी भोवते (वय २३, रा. गोधनी रोड), अशी अटकेतील गुन्हेगारांची नावे आहेत. पाचपावली ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस गस्त घालत होते. तीन गुन्हेगार विविध ठिकाणी हैदोस घालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे पोलिसांनी कारवाई करीत तिघांना अटक करून शस्त्रसाठा जप्त केला.