अ‍ॅपशहर

न्यायासाठी महिलेचा स्वातंत्र्यदिनी आत्मदहनाचा प्रयत्न

नैसर्गिक आपत्तीमुळे कुटूंब आर्थिक कोंडीत सापलेल्या महिलेने स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी या महि‌लेस वेळीच ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. दुर्गा गजानन घाटे (रा. धानोरा फसी, ता. नांदगांव खंडेश्वर) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहे.

Maharashtra Times 17 Aug 2017, 4:00 am
म.टा. वृत्तसेवा, अमरावती
महाराष्ट्र टाइम्स.कॉम amaravati women tryied to committ suicide
न्यायासाठी महिलेचा स्वातंत्र्यदिनी आत्मदहनाचा प्रयत्न

नैसर्गिक आपत्तीमुळे कुटूंब आर्थिक कोंडीत सापलेल्या महिलेने स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी या महि‌लेस वेळीच ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. दुर्गा गजानन घाटे (रा. धानोरा फसी, ता. नांदगांव खंडेश्वर) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहे.

धानोरा फसी येथील दुर्गा घाटे यांच्या घराचे २७ मे २०१७ रोजी आलेल्या वादळात पूर्णत: नुकसान आले. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नुकसान झालेल्या घराची पाहणी केली. यासंदर्भातील शासनाकडे अहवालही पाठविण्यात आला. परंतु, त्यांना अद्याप शासकीय मदत मिळाली नाही. मदतीअभावी जगणे कठीण झाल्याने दुर्गा यांनी त्यांच्या मुलीसह स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. न्याय मिळत नसल्याने त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. घाटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यांच्या हातातील रॉकेलची बॉटली बघताच पोलिसांनी सतर्कतने दुर्गा घाटे यांना ताब्यात घेतले. दरम्यान, स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयात घडलेल्या या प्रकाराने चांगलीच खळबळ उडाली. गाडगेनगर पोलिसांनी याप्रकरणी महिलेविरोधात भादंविच्या कलम १८८, २८५अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज