अ‍ॅपशहर

कुरखेड्यातील कॉलेजमध्ये बिबट-बछड्याचा वावर

कुरखेडा येथील गोविंदराव मुनघाटे कॉलेजमध्ये मादी बिबट व तिच्या बछड्याचा वावर असल्याचे आढळल्याने विद्यार्थ्यांमध्ये दहशत पसरली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मादी बिबट्या आणि तिचा बछडा सर्रास फिरत असल्याचा हा धक्कादायक प्रकार सुरू आहे. रात्रीच्या सुमारास महाविद्यालयाच्या प्रांगणातीलया प्रकारामुळे विद्यार्थी आणि प्राध्यापक हादरले आहेत.

Maharashtra Times 28 Sep 2016, 4:00 am
 म.टा. प्रतिनिधी, गडचिरोली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम chandrapur lepord in collage premaises of collage
कुरखेड्यातील कॉलेजमध्ये बिबट-बछड्याचा वावर

कुरखेडा येथील गोविंदराव मुनघाटे कॉलेजमध्ये मादी बिबट व तिच्या बछड्याचा वावर असल्याचे आढळल्याने विद्यार्थ्यांमध्ये दहशत पसरली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मादी बिबट्या आणि तिचा बछडा सर्रास फिरत असल्याचा हा धक्कादायक प्रकार सुरू आहे. रात्रीच्या सुमारास महाविद्यालयाच्या प्रांगणातीलया प्रकारामुळे विद्यार्थी आणि प्राध्यापक हादरले आहेत.

महाविद्यालयाच्या प्रांगणात या दोहोंच्या पंज्यांचे ठसे निदर्शनास आले. प्राचार्य राजाभाऊ मुनघाटे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतल्यानंतर लगेच प्राणीशास्त्र विभागाच्या चमूने या ठशांचे अवलोकन केले. प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली असता हे ठसे मादी बिबट्या व त्याच्या बछड्याचे असल्याचे स्पष्ट झाले. बिबट्याच्या वावराची बातमी कुरखेड्यात वाऱ्यासारखी पसरताच नाग‌रिकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. काही धोका होण्यापूर्वी वनविभागाने याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज