नागपूर : देशाचे ४७वे सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे यांचा नागपूर हायकोर्ट बार असोसिएशन आणि इतर वकील संघटनांच्यावतीने शनिवार, १४ डिसेंबर रोजी सत्कार करण्यात येणार आहे. मूळचे नागपूरकर असलेले न्या. शरद बोबडे यांचा हायकोर्टाच्या प्रांगणात १४ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६.३० वाजता सत्कार होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रीम कोर्टातील न्या. भूषण गवई राहणार आहेत. सुप्रीम कोर्टातील सेवानिवृत्त न्यायाधीश विकास सिरपूरकर, मुंबई हायकोर्टातील मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग, नागपूर खंडपीठातील वरिष्ठ प्रशासकीय न्यायाधीश रवी देशपांडे उपस्थित राहतील.
सरन्यायाधीशांचा शनिवारी सत्कार
देशाचे ४७वे सरन्यायाधीश न्या...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Dec 2019, 4:00 am