अ‍ॅपशहर

​ केंद्र, राज्यातील सरकार बंडलबाजः अशोक चव्हाण

'केंद्र आणि राज्यातल्या सरकारने निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे सर्वच घटकांची फसवणूक करणारे भाजपचे सरकार बंडलबाज आहे', अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारविरोधात यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या अनआक्रोश मोर्चाला चव्हाण संबोधित करत होते.

Maharashtra Times 16 Oct 2017, 7:47 pm
म.टा. प्रतिनिधी, यवतमाळ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम congress maharashtra chief ashok chavan went harsh on state and central governments
​ केंद्र, राज्यातील सरकार बंडलबाजः अशोक चव्हाण

'केंद्र आणि राज्यातल्या सरकारने निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे सर्वच घटकांची फसवणूक करणारे भाजपचे सरकार बंडलबाज आहे', अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारविरोधात यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या अनआक्रोश मोर्चाला चव्हाण संबोधित करत होते.

यवतमाळ जिल्ह्यात किटकनाशक फवारताना झालेल्या विषबाधेमुळे २२ शेतक-यांचा मृत्यू झाला आहे. ७५० शेतक-यांना विषबाधा झाली आहे. राज्यात रोज शेतकरी मरतायेत, पण दोन्ही सरकारे मात्र निष्क्रिय आहेत अशा शब्दांत चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर हल्लाबोल केला. चव्हाण पुढे म्हणाले की, यवतमाळमध्ये किड्या मुंग्याप्रमाणे माणसे मरत आहेत पण सरकारला याचे काही देणे घेणे दिसत नाही. मुख्यमंत्री अद्याप यवतमाळला आले नाहीत. या सरकारला संवेदनाच राहिली नाही. सरकारने या घटनेला जबाबदार असणा-या लोकांवर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणीही चव्हाण यांनी यावेळी केली.

भाजप सरकारने दिलेले एकही आश्वासन तीन वर्षात पूर्ण केले नाही. या सरकारने पेट्रोल डिझेलचे भाव वाढवले, अन्नधान्याच्या किमती वाढवल्या, महागाई वाढवली, जातीय तणाव वाढवला, दलित, अल्पसंख्याक, आदिवासी समाजवरील अत्याचारात वाढ झाली. मराठा, मुस्लीम, धनगर समाजाची आरक्षणाचे गाजर दाखवून सरकारने फसवणूक केली आहे असे म्हणत, काल परवा झालेल्या अतिवृष्टीत गाजराचे पीक वाहून गेले आहे, त्यामुळे या सरकारची गाजराची पुंगी वाजणार नाही अशी शब्दात चव्हाण यांनी सरकारची फिरकी घेतली आहे.

चव्हाण पुढे म्हणाले की, शेतकरी, व्यापारी, महिला, विद्यार्थी ,तरूण कोणीही या सरकारच्या कमाकाजावर समाधानी नाही. या सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी आहे. अद्याप एकाही शेतक-याला कर्जमाफीचा एक रूपयाही मिळाला नाही. जीएसटीमुळे व्यापार ठप्प झाला आहे. बेरोजगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सर्वसामान्यांना रोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे आता परिवर्तनाची गरज आहे. काँग्रेस पक्ष परिवर्तनासाठी रस्त्यावरून संघर्ष करायला तयार आहे, तुम्ही साथ द्या परिवर्तन घडवू असे आवाहनही यावेळी चव्हाण यांनी केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज