अ‍ॅपशहर

करोना: 'त्या' ४० पैकी दोन संशयित रुग्ण नागपूरचे

दुबईहून परतलेल्या त्या ४० लोकांमध्ये नागपुरातील दोघांचा समावेश आहे. मात्र नागपुरातील या दोन व्यक्तींमध्ये करोनाची कुठलीही लक्षणे आढळून आली नाहीत. त्यांना साधी सर्दीही झाली नाही. सरकारी रुग्णालयात (मेडिकल) त्यांच्यावर 'वॉच' ठेवण्यात येत आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Mar 2020, 5:50 pm
नागपूर: दुबईहून परतलेल्या त्या ४० लोकांमध्ये नागपुरातील दोघांचा समावेश आहे. मात्र नागपुरातील या दोन व्यक्तींमध्ये करोनाची कुठलीही लक्षणे आढळून आली नाहीत. त्यांना साधी सर्दीही झाली नाही. सरकारी रुग्णालयात (मेडिकल) त्यांच्यावर 'वॉच' ठेवण्यात येत आहे. नागपुरातील ११ संशयित रुग्णांपैकी ९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, दोघांचे अहवाल यायचे आहेत. त्यामुळे नागपुरकरांनी घाबरण्याचे कारण नाही, असं जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम corona in pune


'करोना'च्या फेक न्यूज विरोधात गुगलची मोहीम
करोना: पुणे, अहमदनगरमध्ये मास्कचा तुटवडा
नागपुरात आतापर्यंत करोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. नागपुरातील नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. नागपुरात आतापर्यंत दुबई येथून तीन आणि इटली येथून एक रुग्ण आला आहे. या चार जणांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे 'वॉच' ठेवण्यात येत असल्याचे ठाकरे म्हणाले.

करोना: 'औरंगाबादची निवडणूक पुढे ढकला'
'त्या' करोना रुग्णांची प्रकृती स्थिर: मुख्यमंत्री

शाळा, कॉलेजला सुट्टी नाही

नागपुरकरांनो, पॅनिक होऊ नका. केवळ काळजी घ्या, शाळा, कॉलेजला सुट्टी देण्याची सध्या गरज नाही, असे ठाकरे यांनी सांगितले. गर्दीच्या ठिकाणी काय काळजी घ्यायची याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. मंदिरात होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर इथेही जनजागृती केली जात आहे. गुरूवारी साई मंदिरात या स्वरूपाची जनजागृती करण्यात येईल, असे ठाकरे म्हणाले.



मास्क पण नको

मास्कबाबत गैरसमज पसरवले जात आहेत. काही तक्रारीही जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांना मास्क वापरण्याची गरज नाही. केवळ रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या डॉक्टरांनीच मास्क वापरायचे आहे, असे ठाकरे म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज