अ‍ॅपशहर

चिंता वाढली! यवतमाळमधील ११ जणांचा पुण्यातील 'करोना'ग्रस्तांसोबत प्रवास

यवतमाळ जिल्ह्याच्या घाटंजी तालुक्यातील ११ जणांना करोनाची (Coronavirus) लागण झाली असावी, असा संशय आहे. हे ११ जण पुण्यातील करोनाबाधितांबरोबर एकाच विमानात होते. त्यामुळं आज दुपारी त्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Mar 2020, 3:36 pm
यवतमाळ: करोना विषाणूचा (Coronavirus) संसर्ग झालेल्या पुण्यातील 'त्या' प्रवाशांबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील ११ जणांनी प्रवास केल्याचं उघडकीस आल्यानं प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. या सर्व ११ जणांना घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या असून आज दुपारी त्यांची आरोग्य तपासणी होणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Corona


करोना: 'ते' सहा प्रवासी कस्तुरबामध्ये दाखल

यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील तीन कुटुंबातील अकरा जण २४ फेब्रुवारीला दुबईला गेले होते. तिथून १ मार्चला ते परत आले. प्राथमिक तपासणीनंतर यातील एक तरुण शिक्षणाच्या निमित्तानं पुण्याला गेला. मात्र, दुबईहून आलेल्या दोन पुणेकरांना करोनाचा संसर्ग झाल्याचं उघडकीस येताच खळबळ उडाली. त्यांच्यासोबत गेलेल्या प्रवाशांचा शोध घेतला असता यवतमाळ जिल्ह्यातील ते ११ जण करोनाबाधितांसोबत विमानात होते ही माहिती समोर आली. त्यामुळं पुण्याला गेलेल्या तरुणाची पुन्हा आरोग्य तपासणी केली असता त्याची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं समजतं. त्यामुळं इतर प्रवाशांच्या बाबतीतही संशय व्यक्त केला जात आहे. यवतमाळ जिल्ह्यातील हे प्रवासी दुबईहून परतल्यापासून गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी वावरले आहेत. त्यामुळं चिंतेत भर पडली आहे.

करोना: क्रिकेटपटू अलर्ट; विमानात प्रवासात...

'आम्हाला कसलाही त्रास नाही. कालपर्यंत आमच्याशी कोणी संपर्क साधला नाही. कालपासून अचानक अनेकांचे फोन येत आहेत. घरातून बाहेर पडण्यास आम्हाला मनाई करण्यात आली आहे, असं या संशयितांचं म्हणणं आहे. या कुटुंबातील एक मुलगी वर्ध्याला शिकत असल्याचे समजते.

यवतमाळमधील तीन कुटुंबं दुबईला गेली होती. त्यांना त्यांच्या घरीच निरीक्षणाखाली ठेवण्यात आलंय. अद्याप त्यांच्यात कुठलीही लक्षणे दिसलेली नाहीत. १४ दिवस त्यांना घरीच राहण्यास व काळजी घेण्यास सांगण्यात आलंय.
एम. देवेंद्र सिंग, जिल्हाधिकारी

करोना: आजारी मुलांना शाळेत पाठवू नका!

अहमदनगर: 'ते' चार प्रवासी निरीक्षणाखाली


करोना विषाणूचा संसर्ग झालेल्या पुण्यातील त्या कुटुंबासोबत प्रवास केलेल्या नगर येथील चार प्रवाशांचा शोध महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे. सर्वांची तपासणी करण्यात आली असून त्यांच्यामध्ये करोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. परंतु खबरदारीचा उपाय म्हणून या सर्वांना त्यांच्या घरी निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे, अशी माहिती महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज