अ‍ॅपशहर

बुलडाण्यात एका करोना संशयित रुग्णाचा मृत्यू

विदर्भातील करोनाबाधितांचा आकडा सातवर पोहोचला असून, बुलडाण्यात एका संशयित रुग्णाचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे. आज दिवसभरात विदर्भात एकूण तिघा रुग्णांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Mar 2020, 7:14 pm

करोना: सरकारचा मोठा निर्णय; सर्व शाळा-कॉलेज बंद राहणार

नागपूर: करोनानं विदर्भातही शिरकाव केला आहे. अवघ्या ७२ तासांत आणखी सहा जणांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे. त्यामुळं लोकांमध्ये धडकी भरली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील एका करोना संशयिताचा मृत्यू झाला आहे. त्याचा अहवाल अद्याप यायचा आहे. शिवाय यवतमाळमधील दोन, तर नागपुरात आणखी एकाला करोनाची लागण झाल्यानं हा आकडा आता सातवर पोहोचला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम murder


अमेरिकेतून प्रवास करून नागपुरात आलेल्या एकाला बुधवारी करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर अवघ्या ४८ तासांत करोनाची लागण झालेल्याची पत्नी आणि त्याच्याच सोबत विमान प्रवास करून आलेल्या एका सहकाऱ्यालाही करोनाची बाधा झाल्याचे सिद्ध झाले. याच तिघांसोबत आणखी चार संशयिताचे नमुने शुक्रवारी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्यापैकी तिघांचा अहवाल शुक्रवारी रात्रीच निगेटिव्ह आला होता.

यवतमाळमध्ये दोघांना करोना, राज्यात २२ रुग्ण

तर त्यापैकी एकाला करोनाची लक्षणे आढळल्याने त्या व्यक्तीचे पुन्हा एकदा नमुने गोळा करण्यात आले. त्याची तपासणी केली असता या व्यक्तीला करोनाची लागण झाल्याचे शनिवारी सिद्ध झाले. या घडामोडीत परदेशातून प्रवास करून आलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील नऊ जणांचे नमुने मेयोच्या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्यापैकी दोघांचा अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आढळला. त्यामुळे करोनाची लागण झालेल्या विदर्भातील रुग्णांची संख्या आता सातवर गेली आहे.

'करोना'चा सामना कसा कराल, सांगतोय कोहली

खबरदारी घ्या! नागपूरमध्ये करोनाचा चौथा रुग्ण



मिटींगच्या नावाखाली अधिकारी नॉटरिचेबल

या घडामोडीत पुण्यातील करोनाग्रस्त तिघांच्या संपर्कात आलेल्या यवतमाळातील नऊ जणांना प्रतिबंधित उपाय म्हणून शासकीय रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्या थुंकीचे नमुने मेयोत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी दोघांचा अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आला. मात्र या बाबत अधिकृत माहिती घेण्यासाठी आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलीया आणि नागपूरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवंद्र पातूरकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तिघांनीही मिटींग सुरू असल्याच्या नावाखाली कोणत्याही वृत्ताला दुजोरा दिला नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी आणि समाजमाध्यमांमधल्या अफवांवरून गोंधळात भर पडत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज