अ‍ॅपशहर

नागपुरात आणखी एकाला करोनाची लागण

नागपूरमध्ये काल दोन जणांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आज, आणखी एका संशयिताला करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्याच्या नमुन्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Mar 2020, 3:15 pm
नागपूर: जगभरात थैमान घातलेला करोना आता विदर्भातही धडकला आहे. नागपुरात काल, शुक्रवारी दोन जणांना लागण झालेली असतानाच, आज, शनिवारी आणखी एकाला करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्याच्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम corona virus


करोनाने बुधवारी विदर्भाचे दार ठोठावले असताना, अवघ्या ७२ तासांत शुक्रवारी यात आणखी दोघांची भर पडली होती. त्यामुळे करोनाबाधितांची संख्या नागपुरात तीनवर पोहोचली होती. यात करोनाबाधिताची पत्नी आणि त्याच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्याचाही समावेश आहे. चिंतेची बाब म्हणजे, याच रुग्णासोबत विमानप्रवास केलेल्या आणि त्याच्याच कंपनीत काम करणाऱ्या आणखी चार जणांचे नमुनेही तडकाफडकी तपासणीसाठी मेयोच्या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्यापैकी दोघांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर आज आणखी एका रुग्णाचे नमुने पॉझिटिव्ह आल्याचं अहवालातून स्पष्ट झालं आहे. त्यामुळं नागपुरातील करोनाबाधित रुग्णांचा आकडा चारवर पोहोचला आहे.

करोना: शाळा-कॉलेजांना सुट्टी द्या; कोर्टात याचिका
करोना: आता आव्हान मानसिक आरोग्याचे
काय कराल?

चीन, इराण, इटली, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या सात देशांमधून प्रवास केलेल्यांना विलग करण्यात यावे, अशी सूचना केंद्र सरकारकडून करण्यात आली होती. या सूचनेनुसार, या सात देशांतून आलेल्या व येणाऱ्या प्रवाशांचे १०० टक्के विलगीकरण करण्यात येत आहे. या देशातून १५ फेब्रुवारीनंतर ज्यांनी प्रवास केला आहे आणि ते देशात परतले आहेत, त्यांना सक्तीने १४ दिवस घरीच स्वतंत्र राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळे असलेल्या शहरांमध्ये विलगीकरणाची सुविधा तातडीने निर्माण करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती. या सूचनेनुसार नागपुरात आमदार निवास येथील विंग-२ येथे ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

करोना: जाणून घ्या मुंबईतील तपासणीचे अपडेट्स

नागपूर: 'मेयो'तून करोना संशयित ४ रुग्ण पळाले

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज