अ‍ॅपशहर

'मोदींची नोटाबंदी राष्ट्रीय आपत्तीपेक्षाही भयानक'

'मोदी सरकारनं केलेल्या नोटाबंदीमुळं गरिबांचा कणाच मोडला आहे. एखाद्या राष्ट्रीय आपत्तीपेक्षाही भयानक त्रास या निर्णयामुळं झाला आहे. नोटांबदी हा या वर्षातील सर्वात मोठा घोटाळा असून त्याची चौकशी व्हायलाच हवी,' अशी जोरदार मागणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज केली.

Maharashtra Times 13 Dec 2016, 12:05 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नागपूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम demonetisation biggest scam of the year says p chidambaram
'मोदींची नोटाबंदी राष्ट्रीय आपत्तीपेक्षाही भयानक'


'मोदी सरकारनं केलेल्या नोटाबंदीमुळं गरिबांचा कणाच मोडला आहे. एखाद्या राष्ट्रीय आपत्तीपेक्षाही भयानक त्रास या निर्णयामुळं झाला आहे. नोटांबदी हा या वर्षातील सर्वात मोठा घोटाळा असून त्याची चौकशी व्हायलाच हवी,' अशी जोरदार मागणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज केली.

नागपूर येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 'नोटाबंदीचा निर्णय हा अविचारी आणि निरर्थक आहे. तो कोणालाही आवडलेला नाही. जगातील एकही माणूस याबद्दल चांगलं बोललेला नाही. प्रत्येक मोठ्या वर्तमानपत्रानं आणि अर्थतज्ज्ञानं या निर्णयाचा निषेधच केला आहे,' असं ते म्हणाले. 'नोटाबंदीमुळं देशाला नेमका काय फायदा झाला? भ्रष्टाचार थांबला का? काळा पैसा निर्माण होणं थांबलं का? यामागचा सरकारचा उद्देश पूर्ण फसला आहे. केवळ गरिबांना शिक्षा झाली आहे,' असं ते म्हणाले.

चिदंबरम म्हणाले...

> देशातील ४५ कोटी लोकांना नोटाबंदीचा फटका बसलाय. त्याची भरपाई कोण करणार?

> जिल्हा बँकांवर लादलेल्या निर्बंधांमुळं शेतकऱ्यांना फटका बसलाय. त्यांच्याकडं खतं, बियाणं घेण्यासाठी आणि मजुरांची मजुरी देण्यासाठी पैसे नाहीत.

> बँकांकडं पैसाच नाही. तरीही आठवड्याला २४ हजार रुपये काढण्याची मुभा सरकारनं दिली आहे. हा निर्णय घेताना सरकारनं कोणतं गणित केलं?

> नोटाबंदीचा निर्णय घेण्याआधी सरकारनं मनमोहन सिंग यांच्याशी चर्चा करायला हवी होती. अगदीच नाहीतर, स्वत:च्या पक्षाच्या यशवंत सिन्हा यांच्याशी तरी बोलायला हवं होतं.

> नोटाबंदीवरील चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी सभागृहात उपस्थित राहावे, हा विरोधी पक्षाचा आग्रह योग्यच आहे. पंतप्रधानांनी आमचं म्हणणं ऐकायलाच हवं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज