अ‍ॅपशहर

लवकरात लवकर सरकार स्थापन होईल: CM फडणवीस

परतीच्या पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झाल्याने राज्यावर मोठं संकट ओढावलं आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना सर्व मदत करण्यात येतेय. जे निर्णय काळजीवाहू सरकार घेऊ शकतं ते सर्व निर्णय घेण्यात येत आहेत. पण काळजीवाहू सरकारला मर्यादा येत असल्याने काम करताना अडचण होते, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच राज्यात लवकरात लवकर सरकार स्थापन होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Nov 2019, 5:19 pm
अकोलाः परतीच्या पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झाल्याने राज्यावर मोठं संकट ओढावलं आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना सर्व मदत करण्यात येतेय. जे निर्णय काळजीवाहू सरकार घेऊ शकतं ते सर्व निर्णय घेण्यात येत आहेत. पण काळजीवाहू सरकारला मर्यादा येत असल्याने काम करताना अडचण होते, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच राज्यात लवकरात लवकर सरकार स्थापन होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम devendra-fadnavis


परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. शेतात पाणीच पाणी झाल्यानं पिकं पाण्यात गेलीय. मुख्यमंत्र्यांनी अकोल्याचा दौरा करत नुकसानाची पाहणी केली. पवासामुळे हाताशी आलेला हंगाम नष्ट झाला आहे. ओल्या दुष्काळाची स्थिती आहे. पण शेतकऱ्यांनी चिंता करू नये. त्यांना सर्व मदत केली जाईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. पण यावेळी त्यांनी काळजीवाहू सरकारची अडचणही नमूद केली. काळजीवाहू सरकारला काम करताना अडचणी येतात. मात्र, राज्यात लवकरात लवकर सरकार स्थापन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अजित पवारांना आला संजय राऊतांचा एसएमएस!

आदिवासी महिलाही म्हणाली, मोदींना हटवा: पवार

मुख्यमंत्री फडणवीस यांनी अकोला जिल्ह्यातील लाखनवाडा, चिखलगाव आणि म्हैसपूर या गावांमधील शेतकर्‍यांच्या शेतांमध्ये जाऊन पावसाने झालेल्या नुकसानीची आज पाहणी केली. ऑक्टोबरच्या पावसाने सोयाबीन, ज्वारी, कापूस, मूग अशा सर्वच प्रकारच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांना जनतेनं ट्रोल केलंयः छगन भुजबळ

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज