अ‍ॅपशहर

सपना नरबळी प्रकरणी कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय. ७ जणांना फाशी

यवतमाळमधील बहुचर्चित सपना पळसकर नरबळी प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देत ७ जणांना फाशीची शिक्षा ठोठावली आहे. या सात नराधमांनी गावाच्या भल्यासाठी सपनाचा नरबळी दिला होता. ५ वर्षांपूर्वी २०१२ मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील चोरंबा गावात ही अमानुष घटना घडली होती. सात वर्षांच्या लहानग्या सपनाचा तिच्या सख्ख्या नातेवाईकांनीच हा बळी दिला होता. पाच वर्षांनंतर का होईना पण सपनाला योग्य न्याय मिळाला अशी भावना परिसरातील नागरिक व्यक्त करू लागले आहेत.

Maharashtra Times 14 Aug 2017, 9:09 pm
मटा ऑनलाइन वृत्त। यवतमाळ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम district court of yavatmal delcairs death tentence in sapna palaskar narabali case
सपना नरबळी प्रकरणी कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय. ७ जणांना फाशी

यवतमाळमधील बहुचर्चित सपना पळसकर नरबळी प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देत ७ जणांना फाशीची शिक्षा ठोठावली आहे. या सात नराधमांनी गावाच्या भल्यासाठी सपनाचा नरबळी दिला होता. ५ वर्षांपूर्वी २०१२ मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील चोरंबा गावात ही अमानुष घटना घडली होती. सात वर्षांच्या लहानग्या सपनाचा तिच्या सख्ख्या नातेवाईकांनीच हा बळी दिला होता. पाच वर्षांनंतर का होईना पण सपनाला योग्य न्याय मिळाला अशी भावना परिसरातील नागरिक व्यक्त करू लागले आहेत.

पुनाजी आत्राम ( सपनाचे आजोबा), यशोदा मेश्राम (आजी) मनोज आत्राम (मामा), देवीदास आत्राम, यादवराव टेकाम, रामचंद्र आत्राम, मोतीराम आत्राम हे नरबळी प्रकरणात दोषी असल्याचे सिद्ध झाले. जिल्हा सत्र न्यायालयाने सपनाला न्याय देत या सातही जणांना फाशीची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात दुर्गा शिरभाते हिला मात्र कोर्टाने ५ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.

जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए एस वाघमारे यांनी परिस्थितीजन्य पुरावे आणि डीएनए अहवालाच्या आधारे आपला निर्णय दिला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज