अ‍ॅपशहर

कॉलेजांमध्ये प‌ुन्हा विद्यार्थी निवडणुका

राज्यातील कॉलेजे आणि विद्यापीठांमध्ये बंद करण्यात आलेल्या विद्यार्थी निवडणुकांचा मार्ग पुन्हा मोकळा झाला असून, तशी परवानगी देणारे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक गुरुवारी विधानसभेच्या दोन्ही सभागृहांमध्ये एकमताने संमत करण्यात आले.

Maharashtra Times 9 Dec 2016, 7:02 am
naresh.kadam@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम elections will be held again in college students
कॉलेजांमध्ये प‌ुन्हा विद्यार्थी निवडणुका


Tweet : @nareshkadamMT

नागपूरः राज्यातील कॉलेजे आणि विद्यापीठांमध्ये बंद करण्यात आलेल्या विद्यार्थी निवडणुकांचा मार्ग पुन्हा मोकळा झाला असून, तशी परवानगी देणारे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक गुरुवारी विधानसभेच्या दोन्ही सभागृहांमध्ये एकमताने संमत करण्यात आले. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर शक्य तो लवकरच निवडणुका घेण्याची शिफारस संयुक्त समितीने केली असल्याने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून या निवडणुका सुरू होणार आहेत.

या मुद्द्यांसह ५६ बाबींचा समावेश असलेले हे विधेयक शालेय शिक्षण आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले होते. कॉलेजच्या विद्यार्थी परिषदेत पूर्वीप्रमाणे सीआर तसेच जीएस असे विद्यार्थी प्रतिनिधी असतील. त्याचबरोबर एक विद्यार्थिनी प्रतिनिधी, अनुसूचित जाती, जमाती, आणि भटक्या विमुक्त या समाजाच्या विद्यार्थ्यांनाही या निवडणूक प्रक्रियेत आरक्षण असेल.

फी, प्रवेशांबाबत तक्रारींचे निवारण

कॉलेजांतील फी आणि प्रवेश प्रक्रियेबाबतच्या तक्रारींच्या निवारणासाठी ‘लोकपाल’सारखी उच्चाधिकार समितीही नेमण्यात येणार आहे. या समितीकडे विद्यार्थ्यांना तक्रार करता येईल व समिती त्या तक्रारींवर निर्णय घेईल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज