गोंदिया : देवरी तालुक्यातील डोंगरगाव-सावली येथील रहिवासी यादव शिवनकर (वय ३९) या शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली. ओला दुष्काळ आणि सततच्या नापिकीमुळे ते त्रस्त होते. त्या विवंचनेतून त्यांनी शेतालगत असलेल्या मोहाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. शिवनकर यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत.
शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या
देवरी तालुक्यातील डोंगरगाव-सावली येथील रहिवासी यादव शिवनकर (वय ३९) या शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Jan 2020, 4:00 am