अ‍ॅपशहर

दुकानदारांना दंड

सम-विषम नियमांचे उल्लंघन; गोपालनगर, प्रतापनगरात कारवाई मटा...

महाराष्ट्र टाइम्स 21 Jul 2020, 7:34 am
सम-विषम नियमांचे उल्लंघन; गोपालनगर, प्रतापनगरात कारवाई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम दुकानदारांना दंड
समविषम नियमांचे दुकानदारांकडून उल्लंघन होत आहे. त्यांना नियम पाळण्याचे आवाहन करीत महापौर संदीप जोशी यांनी दंडात्मक कारवाईचे निर्देशही दिले. सोमवारी गोपालनगर, प्रतापनगर परिसरात अशी कारवाई करण्यात आली. सोबत प्रकाश भोयर, प्रा. दिलीप दिवे, प्रमोद तभाने व अन्य.


म.टा.विशेष प्रतिनिधी,नागपूर

लॉगडाउनमध्ये 'मिशन बिगिन अगेन'अंतर्गत देण्यात आलेल्या शिथीलतेत दुकानदारांसाठी सम-विषम नियम लागू आहे. मात्र, दुकानदार या नियमांचे सर्रास उल्लंघन करीत असल्याचे सोमवारी गोपालनगर, प्रतापनगरात उघडकीस आल्याने दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. महापौर संदीप जोशी यांच्या जनजागृती दौऱ्यात ही बाब उघडकीस आली. मनपाच्या उपद्रव शोध पथकाने दंड वसूल केला.

लॉकडाउनमधील शिथीलतेचा दुकानदारांकडून गैरफायदा घेण्यात येत असल्याची ओरड खरी ठरत आहे. अनेक दुकानदार या नियमांचे उल्लंघन करीत आहेत. अनेकजण दुकानाचे शटर अर्धवट सुरू ठेवून व्यवसाय करीत आहेत. ग्राहकांचाही त्यांना साथ असते. नियमांचे कठोरपणे पालन केल्यास कडक लॉकडाउन वा संचारबंदी टाळता येऊ शकते असे वारंवार सांगण्यात येत असतानाही शहरात बेजबाबदारपणे वागण्याची सवय बंद होत नसल्याचे दुदैंवी चित्र आहे. याचा फटका येणाऱ्या काळात संपूर्ण शहराला बसू शकतो. हे टाळता यावे म्हणूनच महापौरांनी जनजागृती दौरा सुरू केला आहे. सोमवारी त्यांनी माटे चौकातून दौऱ्याला सुरूवात केली. गोपालनगर, प्रतापनगर, खामला, देवनगर आदी भागातील दुकानांची पाहणी करीत कोव्हिड-१९ च्या संदर्भात शासनाने दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन करण्याचे आवाहन केले. सम-विषम तारखांचा नियम दुकानदारांनी पाळावा. मास्क वापरावा, सुरक्षित वावर ठेवावा, अशी विनंतीही केली. नियम पाळा, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही महापौरांनी यावेळी दिला. त्यांच्यासोबत लक्ष्मीनगर झोनचे सभापती प्रकाश भोयर, शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, उपसभापती प्रमोद तभाने, लक्ष्मीनगर झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे आदी उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज