अ‍ॅपशहर

वर्धाः केंद्रीय दारुगोळा भांडारात आग, २० ठार

वर्ध्यामधील पुलगाव येथील केंद्रीय दारुगोळा भांडाराला रात्री उशिरा अचानक आग लागली. स्फोट झाल्याने उसळलेल्या आगीत २० जण ठार झाले असून त्यामध्ये दोन लष्करी अधिका-यांचा समावेश आहे. आगीची दाहकता पाहून पुलगावच्या आजूबाजूच्या दोन गावांमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे.

Maharashtra Times 31 May 2016, 12:25 pm
मटा ऑनलाइन वृत्त । वर्धा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम fire broke out at central ammunition depot in pulgaon last night
वर्धाः केंद्रीय दारुगोळा भांडारात आग, २० ठार

वर्ध्यामधील पुलगाव येथील केंद्रीय दारुगोळा भांडाराला रात्री उशिरा अचानक आग लागली. स्फोट झाल्याने उसळलेल्या आगीत २० जण ठार झाले असून त्यामध्ये दोन लष्करी अधिका-यांचा समावेश आहे. आगीची दाहकता पाहून पुलगावच्या आजूबाजूच्या दोन गावांमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे.

भारतीय लष्कराच्या आखत्यारित येणाऱ्या पुलगाव येथील दारुगोळा केंद्रात रात्री अचानक आग लागल्याने मोठा स्फोट झाला. हा स्फोटामुळे लागलेल्या आगीची तीव्रता इतकी होती की, अनेक किलोमीटरवरूनही या आगीच्या ज्वाळा दिसत होत्या. या आगीची गंभीर दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने रात्रीच नागझरी आणि आगरगाव या दोन गावांतील नागरिकांना स्थलांतरित केलं आहे.

पुलगावमधील या स्फोटामागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. ही घटना लष्कराशी संबंधित असल्याने सखोल चौकशीनंतरच या घटनेमागचे कारण स्पष्ट होईल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज